Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : भाभा रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेचा वेदनेतून मृत्यू; डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांचा आरोप

Mumbai News : कुर्ला पश्चिममधील हलाव पूल परिसरात राहणाऱ्या सोनी हरीश यादव (२८) यांचा प्रसूतीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 14, 2026 | 07:55 PM
Mumbai News : भाभा रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेचा वेदनेतून मृत्यू; डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांचा आरोप
Follow Us
Follow Us:
  • भाभा रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेचा वेदनेतून मृत्यू
  • डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांचा आरोप
मुंबई : ‘दुपारी अडीचपासून ती वेदनेने तडफडत होती. आम्ही डॉक्टर-नर्सना विनंती करत होतो. पण ‘मर्द के साथ सोते हैं, तो दर्द नहीं होता. इथेच का त्रास होतो?’ असे शब्द ऐकावे लागले आणि काही तासांत माझी पत्नी गेली,’ अशा शब्दांत पती हरीश यादव यांनी कुर्ल्यातील भाभा रुग्णालय येथे घडलेल्या घटनेचा संताप व्यक्त केला.

कुर्ला पश्चिममधील हलाव पूल परिसरात राहणाऱ्या सोनी हरीश यादव (२८) यांचा प्रसूतीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली. डॉक्टर आणि परिचारिकांच्या कथित हलगर्जीपणामुळेच पत्नीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला असून, घटनेनंतर रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला. सोनी यादव यांना १२ मे रोजी सकाळी प्रसूतीसाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री सिझेरियनद्वारे त्यांनी मुलाला जन्म दिला. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारपासून त्यांना छातीत आणि पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या.

Jaslok Hospital : श्वास घेणंही झालं कठीण; प्रचंड हर्नियाग्रस्त महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन

पती हरीश यादव यांनी सांगितले की, ‘दुपारी अडीचच्या सुमारास तिने वेदना होत असल्याचे सांगितले. आम्ही नर्सला बोलावले. त्या म्हणाल्या, ‘सगळं ओके आहे.’ साडेचार वाजता भेटीच्या वेळेत मी नारळपाणी घेऊन आत गेलो. ती डोळे उघडू शकत नव्हती, सतत पडत होती. ती म्हणत होती, ‘मला खूप त्रास होतोय.’ पण डॉक्टर आणि नर्स वारंवार ‘काही झालेलं नाही’ असंच सांगत होते.’ कुटुंबीयांच्या आरोपानुसार, एका परिचारिकेने ‘मर्द के साथ सोते हैं, तो दर्द नहीं होता? इथेच त्रास होतो?” असे अपमानास्पद वक्तव्य केल्याने नातेवाईक संतप्त झाले. त्यानंतर काही वेळाने महिलेची प्रकृती अचानक खालावली. तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मृत्यूची माहिती देण्यास रुग्णालय प्रशासनाने विलंब केल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत निषेध व्यक्त केला. परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरम्यान, मृतदेह जे.जे. रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पोलिस आणि आरोग्य विभागाकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

कुर्ला भाभा रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज वर्मा याना विचारले असता महिलेचा मृत्यू झाला असल्याचे म्हणाले. मात्र मृत महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. डॉक्टरांना मारहाण केली असून यात एका महिला डॉक्टरचे भिंतीवर डोके आपटले. तर दुसऱ्या एका डॉक्टरच्या पोटात लाथ मारली. आणि इतर दोन डॉक्टरांना देखील मारहाण केली. एकूण चार डॉक्टर जखमी झाले असल्याचे डॉ. वर्मा म्हणाले. आता एफआयआर दाखल करणार असल्याचे हि त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Cabinet Decisions: वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी ५०% सवलत; ‘सिंधुरत्न’ योजनेला मुदतवाढ, नाशिकसाठी कोट्यवधींचा निधी

Web Title: Mumbai news woman dies of pain after giving birth at bhabha hospital relatives allege negligence by doctors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.