अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शरद पवार पक्षाचे राज्यभरात ठिकठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आज काळी दिवाळी साजरी केली जात आहे.शेतकऱ्यांची कर्जमाफी करा या प्रमुख मागणीसाठी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालया समोर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यां समवेत दंडाला काळी फीत बांधून राज्य सरकारचा निषेध करत काळी दिवाळी साजरी केली.. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरकारने तारीख पे तारीख दिली. केंद्रातून देखील प्रस्ताव आल्यावर आम्ही मदत जाहीर करू असं आश्वासन देण्यात आलं. मात्र जे पॅकेज जाहीर केलंय ते फसव आहे. एकरी सात हजार पाचशे रुपये पॅकेज सरकारने दिले आहे. सरकारला मनरेगा चे तीन हजार कोटी देणे बाकी आहे.याबाबत या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करून शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने महाराष्ट्रात एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन उपोषणासहित करत असून शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत आली असल्याने या सरकारला जाग येत नसल्या मुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी आणि 50 हजार एकरी मदत करावी.या सरकारला आता मतदाराची गरज नाही कारण बोगस मतदानावर आपण निवडून येतो अशा घमेंडीमध्ये हे सरकार असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.