सातारा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण आणि आरोग्याला विशेष प्राधान्य देत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दोन महत्त्वाकांक्षी योजनांच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. जिल्ह्यातील ८४ पैकी पहिल्या टप्प्यात ४५ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ११४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी २० केंद्रांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना आधुनिक रूप देण्यासाठी पहिल्या टप्प्यात २०९ आदर्श मराठी शाळांची निवड करून २१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही योजनांची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले असून, यामुळे सातारा जिल्हा आरोग्य व शिक्षणात अग्रेसर होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.