ठाण्यातील निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कळवा मुंब्रा परिसरातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडणे, मशीनला शॉक लागणे तसेच खुलेआम पैशांचे वाटप सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा गंभीर गैरप्रकारांकडे निवडणूक यंत्रणा जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. वनमंत्री गणेश नाईक यांनाच मतदानासाठी केंद्र शोधताना पायपीट करावी लागली यातच व्यवस्थेची अवस्था स्पष्ट होते असा टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे.