ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम लहानग्यांच्या आरोग्यासाठी खऱ्या अर्थाने कवच ठरत आहे. “बालपण निरोगी तर भविष्य उज्वल” या ध्येयाने सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत गेल्या ५ वर्षांत तब्बल ५,३७९ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६९७ हृदय शस्त्रक्रिया तर ४,६८२ इतर आजारांवरील शस्त्रक्रिया आहेत.अंगणवाडी व शाळांमधून बालकांची तपासणी, गंभीर आजारांचे निदान आणि जिल्ह्यातील व राज्यातील मान्यताप्राप्त रुग्णालयांत मोफत उपचार-शस्त्रक्रिया या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना नवा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे येथे डॉ. संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसात तब्बल १०० बालकांवर शस्त्रक्रिया झाल्याचा ऐतिहासिक विक्रमही नोंदवला गेला.