
27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी दिवशी ची सर्वत्र बाप्पा विराजमान झाले. यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, संकुलातील गणपती, तसेच घरगुती गणपतीचा समावेश होता. भाविकांनी आपल्या यथाशक्तीनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, तर काहींनी अनंत चतुर्थी पर्यंत बाप्पाची मनोभावे सेवा करून निरोप दिला. बाप्पाला निरोप देताना काढलेल्या विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन झालेले आढळून आल्याने, नेरूळ पोलिसांनी परिसरातील 6 गणेशोत्सव मंडळ गुन्हे दाखल केले आहेत.
सण कोणत्याही धर्माचा असो त्यासाठी कायद्याची चौकट तयार केली आहे. त्या कायद्याच्या अधीन राहूनच आपापले सण गुण्यागोविंदाने साजरा करण्याचे आवाहन, शासन तसा तथा प्रशासन वारंवार करत असते. मात्र तरी देखील काही उत्सवकर्मी याचे उल्लंघन करताना दिसून येतात. अशाच प्रकारचे उल्लंघन करणाऱ्या नेरूळ पोलीस ठाणे हद्दीतील, जुईनगर मधील 3 मंडळे व नेरूळ मधील 3 मंडळे अशा एकूण 6 मंडळातील 20 पदाधिकारी व 7 कार्यकर्त्यांवर, नेरूळ पोलीस ठाण्यात ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्या ठिकाणी किती डेसिबल पर्यंत दोन्ही मर्यादा असावी
औद्योगिक क्षेत्रात:- दिवसा 75 डिसिबल तर रात्री 70 डेसिबल
व्यावसायिक क्षेत्रात:- दिवसा 65 डेसिबल तर रात्री 55 डेसिबल
रहिवासी क्षेत्रात:- दिवसा 55 डेसिबल तर रात्री 45 डेसिबल
शांतता क्षेत्रात:- दिवसा 50 डेसिबल तर रात्री 40 डेसिबल.
या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.