शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख नगरसेवक अरुण आशान यांच्या वतीने उल्हासनगरच्या नेताजी चौकात यंदा भव्य आणि आकर्षक दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती अरुण आशान यांनी दिली.या दहीहंडी सोहळ्यात विजेत्या गोविंदा पथकाला ₹५५,५५५ रुपये रोख बक्षीस तसेच विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत. यंदाचा मान महालक्ष्मी सेवा संस्थेला मिळाला असून अध्यक्षपदाची जबाबदारी मधू गव्हाणे यांनी स्वीकारली आहे.दरवर्षी शूरवीर अनिल लक्ष्मण आशान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो. यंदाही जय्यत तयारी करण्यात आली असून विविध लोकप्रिय सिनेकलाकार देखील उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.