Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

उल्हासनगर कॅम्प क्रमांक 2 येथील नेहरू चौक परिसरात सोमवारी रात्री एक धक्कादायक प्रकार घडला. हातगाडीवरून माल विकणाऱ्या तीन फेरीवाल्यांनी एका दुकानदार आणि त्याच्या कर्मचाऱ्यावर बेदम हल्ला केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 15, 2025 | 03:45 PM

Follow Us

उल्हासनगर कॅम्प क्रमांक 2 येथील नेहरू चौक परिसरात सोमवारी रात्री एक धक्कादायक प्रकार घडला. हातगाडीवरून माल विकणाऱ्या तीन फेरीवाल्यांनी एका दुकानदार आणि त्याच्या कर्मचाऱ्यावर बेदम हल्ला केला. या मारहाणीमध्ये दुकानातील कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निखिल बुधरानी यांच्या “धूम प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल” या दुकानाबाहेर ही घटना घडली. धर्मराज तिवारी हे त्या दुकानात कर्मचारी म्हणून काम करतात. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुकानाबाहेर बजाज चेतक मोटरसायकल पार्क करताना धर्मराज यांनी हातगाडीवाल्याला गाडी हटविण्यास सांगितले. त्यावरून वाद निर्माण झाला आणि तो फेरीवाला संतापून शिवीगाळ करू लागला. थोड्याच वेळात त्याने आपल्या दोन साथीदारांना बोलावले आणि तिघांनी मिळून धर्मराजवर ठोसे-मुक्क्यांनी हल्ला चढवला. मध्ये पडलेल्या दुकानदार निखिल बुधरानी यांनाही त्यांनी मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच व्यापारी नेता दीपक छतलानी घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रेम संजय गुप्ता, कृष्ण संजय गुप्ता आणि राहुल दिनेश गुप्ता या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून त्यांनी पोलिस आणि महापालिकेकडे फेरीवाल्यांच्या दादागिरीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. सध्या पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

Close

Follow Us:

Web Title: Ulhasnagar bullying of hawkers in ulhasnagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

Ulhasanagar : स्थायी समिती सभापतीपदी कलवंत सिंग सहोता यांची निवड निश्चित?
1

Ulhasanagar : स्थायी समिती सभापतीपदी कलवंत सिंग सहोता यांची निवड निश्चित?

Ulhasnagar Crime : नकली पिस्तूल आणि खोटा सीबीआय बॅच;  नोकरीच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारा भामटा जेरबंद
2

Ulhasnagar Crime : नकली पिस्तूल आणि खोटा सीबीआय बॅच; नोकरीच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारा भामटा जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.