उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाचमधील तानाजी नगर परिसरात मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास मोठी घटना घडली. दहा ते बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याने अचानक रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर हल्ला चढवून तोडफोड केली. या हल्ल्यात चार मोटरसायकल, दोन रिक्षा आणि दोन टेम्पोसह आठ ते दहा वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या तर पेट्रोल टाक्यांनाही लक्ष्य करण्यात आले. या तोडफोडीमुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी विपुल मयेकर यांनी तातडीने हिललाइन पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.