रोहित पवार यांच्या पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनावर भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी जोरदार टीका केली आहे. “हे आंदोलन नाही, रोहित पवार नाईट्स सुरू आहेत,” असा खोचक आरोप करत पाचपुते यांनी आंदोलनाच्या स्वरूपावर आणि तेथे सुरू असलेल्या कार्यक्रमांवर सवाल उपस्थित केले. पाचपुते यांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर आंदोलनस्थळी ५० ते १०० लोक असतात, तर रात्रीच्या शिफ्टमध्ये आंदोलन सुरू असते. आंदोलनस्थळी कॉमेडियन आणि गाण्यांचे कार्यक्रम होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आंदोलनस्थळी गेले असता विद्यार्थ्यांनी त्यांना ट्रोल केल्याचाही दावा पाचपुते यांनी केला.