Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई

Dangerous Propose Video : प्रेमाच्या नादात जीव टाकला धोक्यात! न्यूयाॅर्कच्या आयकॉनिक एम्पायर स्टेट बिल्डिंगवर जोडप्याने प्रपोज करु पाहिलं पण थोड्याच वेळात इथे पोलिसांनी सरप्राईज एंट्री झाली. पाहा व्हिडिओत काय घडलं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 02, 2026 | 12:42 PM
VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई

Follow Us
Follow Us:
  • 1,454 फूट उंचीवर प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी तरुणाने धाडसी स्टंट केला.
  • प्रपोजलनंतर काही क्षणांतच घटनास्थळी पोलिसांनी कारवाई केली.
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
असं म्हणतात प्रेमात पडलेला व्यक्ती काहीही करु शकतो. ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटातील हा फेमस डायलाॅग तर तुम्ही ऐकलाच असेल. आजच्या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला याचे जिवंत उदाहरण पाहायला मिळणार आहे. घटना न्यूयाॅर्कच्या प्रतिष्ठित आयकॉनिक एम्पायर स्टेट बिल्डिंगवर (Empire State Building) घडून आली. प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी एका साहसी प्रियकराने थरारक स्टंट करत प्रेमाची कबुली देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या प्रयत्नात तो सफल तर झाला, प्रेयसीने त्याचे हे प्रपोजल स्वाकारले परंतु काहीच क्षणात तिथे पोलिसांची सरप्राईज एंट्री झाली. चला नक्की प्रकरण काय ते सविस्तर जाणून घेऊया.

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral

सेफ्टी गेअरवर चढून केलं प्रपोज

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. रुफटाॅप स्टंटसाठी लोकप्रिय असलेले कपल 33 वर्षीय एंजेला निकोलाउ (Angela Nikolau) आणि 32 वर्षीय इवान कुजनेत्सोव (Ivan Beerkus) यांनी सुरक्षा उपकरणांशिवाय एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या सर्वोच्च बिंदूवर, म्हणजेच शिखरावर जाण्याचा निर्णय घेतला. जमिनीपासून सुमारे १,४५४ फूट उंचीवर असलेले हे ठिकाण केवळ एक धातूची रचना आणि अँटेना असून तिथे सोसाट्याचा वारा देखील सुरु असतो.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये उंचावर पोहचल्यावर कपलने एक काळा बॅनर हवेत फडकवल्याचे दिसते. यावर लिहिले होते की, “जेव्हा प्रेमाची शक्ती सत्तेच्या आकर्षणावर मात करेल, त्या दिवशी जगात शांतता नांदेल.” यानंतर इव्हान गुडघ्यावर बसला आणि त्याने फिल्मी स्टाईलमध्ये अंगठीचा डब्बा ओपन करुन एंजेलाला प्रपोज केलं. व्हिडिओमध्ये एंजेला त्याला होकार देताना दिसते ज्यानंतर ते या क्षणाचा आनंद साजरा करत होते. पण काही वेळातच तिथे पोलासांची एंट्री होते.

Two masked people named Angela Nikolau and Ivan Beerkus, dressed as Batman and Catwoman, were spotted hanging a flag from the upper tier of the Empire State Building on Wednesday. The figures were observed near the top of the Midtown Manhattan landmark with a large banner… pic.twitter.com/dlwOnuPuyc — Damon Strong (@DamonStrong) July 1, 2026

धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral

न्यूयाॅर्क पोलिसांनी जोडप्याला अटक केली असून बेकायदेशीर प्रवेश, धोकादायक कृत्य, मालमत्तेचे नुकसान आणि सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या प्रवक्त्याने म्हटले की, “आमचा ऑब्झर्व्हेशन डेक प्रपोजलसाठी एक सुंदर आणि सुरक्षित जागा आहे, परंतु कोणालाही आपला जीव धोक्यात घालून असे स्टंट करण्याची परवानगी नाही.” या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून याला @DamonStrong नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. यूजर्स व्हिडिओला वेगाने शेअर करत असून प्रपोज नव्हे तर हा जीवनाचा शेवट अशा प्रतिक्रिया व्हिडिओला मिळत आहेत.

Web Title: 1454 feet high proposal on empire state building goes viral police arrested couple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • new york
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral
1

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral

VIRAL : असा कसा श्रीमंतीचा थाट! खासदाराच्या घरात चक्क सापडली सोन्याची ब्रा अन् रत्नजडित बिकनी?
2

VIRAL : असा कसा श्रीमंतीचा थाट! खासदाराच्या घरात चक्क सापडली सोन्याची ब्रा अन् रत्नजडित बिकनी?

‘पहिले बॉल तर…, तू धावला का…?’ इशान किशन शून्यावर रनआउट अन् अभिषेक संतापला, Video Viral
3

‘पहिले बॉल तर…, तू धावला का…?’ इशान किशन शून्यावर रनआउट अन् अभिषेक संतापला, Video Viral

धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral
4

धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.