'मेरा नाम चिन चिन चू बाबा चिन चिन चू', 82 वर्षीय आजीचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस...
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की, आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात ज्यामुळे आपल्या एक वेगळाच उत्साह निर्माण होते. अनेकदा तुम्ही अनेकांचे डान्स रिल्स पाहिले असतील. लहानांपासून वयोदृद्धांपर्यंत सर्वच असे भन्नाट डान्स व्हिडिओ बनवत असतात.
सध्या असाच एक 820 वर्षीय आजीचा जबरदस्त डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. या व्हिडिओमध्ये आजींनी खूप सुंबर डान्स केला आहे. या व्हिडिओवरून लक्षात येते की, आपल्या आयुष्याचा प्रत्येत क्षण आपल्याला आनंदात जगता आला पाहिजे. हा व्हिडिओ एकदा पाहाच तुम्हाला देखील नक्की आवडेल.
आजीचा भन्नाट डान्स
व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक आजी मेरा नाम चिन चिन चू बाबा चिन चिन चू या गाण्यावर डान्स करत आहेत. त्यांच्या डान्स पाहून कार्यक्रमातील अनेक लोक प्रतिसाद देत टाळ्या वाजवत आहेत. आजी अगदी आनंदाने डान्स करत आहे. त्यांच्या डान्सवरुन आपण समजू शकतो की कलेला वयाचे कोणतेही बंधन नसते. आपण आपल्याला आवडणारी गोष्ट आनंदाने करत राहिले पाहिजे. हा व्हिडिओ पाहिल्यावर आजीचा डान्स आणि चेहऱ्यावरील उत्साह पाहून तुम्हाला देखील डान्स करावा वाटेल. हा व्हिडिओ एका महिला महोत्सव कार्यक्रमातील असल्याचे व्हिडिओत दिसणाऱ्या पोस्टवरून लक्षात येते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देत आजींचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, खूप दिवसानंतर अशी रिल पाहिली, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, यांचा डान्स मी दरवर्षी पाहते, खूप छान डान्स करतात त्या. आणखी एका युजरने म्हटले आहे याला म्हणतात आयुष्या प्रत्येक क्षण आनंदात जगणे. तसेच अनेकांनी या व्हिडिओला रिपोस्ट केले आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमामात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.