फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात ज्यामुळे आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होतात की, हसावे-रडावे काही कळत नाही. तसेच सध्या अलीकडे लोकांनी परील बणवण्याचे, सोशल मीडियावर फेमस होण्याचे वेड लागले आहे. लोकांनी एक असा रोग लागला आहे की, यासाठी ते काही पण करायला तयार असतात.
अनेकदा लोक आपला जीव धोक्यात देखील घालतात. तर अनेकदा अश्लील कृत्य करायला मागे-पुढे पाहात नाहीत. सध्या असाच एक तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. कारण या तरूणीने टॉवेल गुंडाळून असे काही केले आहे की, लोकत तिला पाहतच राहिले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर काहींनी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, इंडिया गेट पाशी ही मुलगी टॉवेल गुंडाळून आलेली आहे. ती दिल वाले दुल्हनिया मधील मेरे ख्याबो में जो आए या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अनेक पर्यटक तिला पाहतच राहिले आहेत. याआधी देखील तिला ट्रोल करण्यात आले होते. या मुलीचे नाव सन्नाती असून ती 2016 च्या मिस कोलकत्ता स्पर्धेची विजेती असल्याचा दावा करण्यात आला आहे. याआदी देखी तिला दुर्गा पूजा पांडलच्यामध्ये अशाच एका कृत्यावरून तिला ट्रोल करण्यात आले होते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ स्वत: सन्नाती ने आपल्या इन्स्टाग्राम @sannati हॅंडलवर शेअर केला आहे. अनेकांनी या व्हिडिओत तिला ट्रोल केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, व्हूज मिळवण्यासाठीअलीकडे लो क काहीपण करतात. तसेच दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, अगं ताई मानले तुझे विचार बोल्ड आहेत पण इतके. तसेच आणखी एकाने म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी तिच्या अश्लील कृत्याबद्दल तिच्यावर कारवाई करण्यात यावी. अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत. मात्र एका युजरने ट्रोल करणाऱ्यांनाच ट्रोल केले आहे. त्याने म्हटले आहे की, तुम्हीच तिच्या व्हिडिओला लाईक करणे बंद करा मग ती असे व्हिडिओ बनवणार नाही, आधी स्वत:कडे बघा मग दुसऱ्याला सल्ला द्या.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.