फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर हसू आवरणे कठीण होऊन जाते. स्टंट, जुगाड, डान्स रिल्स आणि भांडण असे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. याशिवाय तुम्ही रस्त्यांवर पाट्या घेऊन उभे राहणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील.
या पाट्यांवर असे काहीतरी भन्नाट लिहिलेले असते की वाचून पोट दुखून येते. अनेकदा सत्य गोष्टींवर भाष्य केलेले गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरूणी लग्नाचा बायोडेटा घेऊन मुंबईच्या रस्त्यावर फिरत आहे. तिची ही पाटी पाहून रस्त्यावर येमारे जाणारे लोक तिला वळून वळून पाहत आहेत. तसेच याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत.
बायोडेटा घेऊन तरुणी रस्त्यावर
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरूणी रस्त्यावर पाटी घेऊन उभी आहे. रस्त्यावर येणारे-जाणारे लोक तिच्याकडे वळून वळून पाहत आहेत. अनेकजण हसत आहेत. यामागचे कारण म्हणजे तिने पाटीवर लग्नाचा बायोडेटा लिहिलेला आहे. विशेष म्हणजे तिने लिहिले आहे की तिला लग्नासाठी मुंबईचाच मुलगा पाहिजे. याशिवाय तिने तिचे नाव, वय जन्मतारिख शिक्षण आणि मुलाचे शिक्षण काय हवे याबद्दल लिहिले आहे. या मुलीचे नाव सायली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @sayali_sawant18_official या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, व्वा ताई, लवकरच मिळतील आमचे भाऊजी, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, खरोखरच लग्ना करायचा विचार करत आहात का? असा प्रश्न विचारला आहे. आणखी एका युजरने म्हटले आहे की, नाद नाही करायचा मॅडमचा. चौथ्या एकाने म्हटले आहे की, मी मुंबईचाच आहे, पण मला तुमच्यासी लग्न नाही करायचे आणि हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.