जे मानवाला जमले नाही ते छोट्या गजराजाने करून दाखवले; सोंडेने कचरा उचलून पेटीत टाकले अन् मनोमन आईही लागली हसू; Video Viral
जंगलातील प्रत्येक प्राणी हा आपल्या कोणत्या ना कोणत्या गुणांसाठी ओळखला जातो. जंगलातील एक विशाल आणि ताकदवान प्राण्यांमध्ये गजराज म्हणजे हत्तीचा समावेश होतो. आपले विशाल शरीर पण शांत आणि मनमिळावू स्वभावाने तो नेहमीच माणसांमध्ये आवडीने वावरताना दिसून येतो. मानवाला याची भीती वाटत नाही कारण हा एकमेव असा प्राणी आहे जो आपल्या ताकदीने कुणावरही विनाकारण हल्ला करत नाही आणि हा एक शाकाहारी प्राणी आहे. दरम्यान नुकताच सोशल मीडियावर एक गजराजाच्या पिल्लाचा एक सुंदर आणि गोड व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात तो रस्त्यावर पडलेला कचरा साफ करताना दिसून आला. स्वच्छतेसाठी आजवर अनेक योजना, कार्यक्रम आयोजित करण्यात आले पण मानवाने कधी स्वच्छतेला महत्त्व दिले नाही अशात एका प्राण्याकडून स्वच्छतेचा संदेश मिळणे फार मोठी गोष्ट आहे. व्हिडिओमध्ये चिमुकला हत्ती फारच गोंडस दिसत आहे आणि त्याच्या या कृतीने त्याने आता सोशल मीडियावर सर्वांचेच मन जिंकून घेतले आहे. चला व्हिडिओत नक्की काय दिसले ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये, एक हत्तीचे पिल्लू त्याच्या आईसोबत रस्त्यावर चालताना दिसत आहे. यावेळी रस्त्यावर एक कचरापेटी असते आणि चालता चालत अचानक चिमुकल्या हत्तीची नजर रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यावर पडते. आपण मानव अनेकदा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, परंतु या छोट्या हत्तीने असे केले नाही. तो थांबला आणि त्याने त्याच्या सोंडेने आणि पायांनी कचरा उचलून काळजीपूर्वक जवळच्या कचऱ्याच्या डब्यात टाकला. या छोट्याशा कृतीतून हत्तीची बुद्धिमत्ताच दिसून आली नाही तर पर्यावरणाप्रती त्याची संवेदनशीलता देखील अधोरेखित झाली. आता हा व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे स्पष्ट झाले नाही परंतु सोशल मीडियावर व्हिडिओने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. काही लोक या व्हिडिओला एआय क्रिएटेड व्हिडिओ असल्याचेही म्हणत आहेत.
जब हाथी का बच्चा कचरे को कूड़ेदान में डालकर रोड को साफ रख सकता है,
तो रोड आप क्यों नहीं साफ रख सकते? pic.twitter.com/uQWoWcg4kv
— Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) July 21, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @Sheetal2242 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वास्तव हे आहे की प्राणी मानवांपेक्षा जास्त बुद्धिमान झाले आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कारण तो एक बुद्धिमान प्राणी आहे, मूर्ख मानव नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे स्पष्टपणे दिसून येते की हा व्हिडिओ एकतर एआय निर्मित आहे किंवा बनावट आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.