(फोटो सौजन्य: X)
समुद्राचे जग हे आपल्या जगापासून फार वेगळे असते. हे जग आश्चर्याने भरलेले असून यात अनेक असे जीव असतात ज्यांना आपण कधीही पाहिले नसेल. असं म्हणतात की, समुद्राचा फक्त १० टक्के भाग हा मानवांनी पाहिला आहे. उर्वरीत ९० टाळले भाग हा अजूनही मानवाने पाहिलेला नाही. अशात एक अद्भुत आणि नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात अनोखे चमकरणारे मासे दिसून आले आहेत. तुम्ही आजवर अनेक प्रकारचे मासे पाहिले असतील पण तुम्ही कधी निळेशार चमकदार मासे कधी पाहिले आहेत का? जर नाही तर आता तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे. चला व्हिडिओत काय दिसलं ते सविस्तर जाणून घ्या.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही मासे पाण्यात पोहताना दिसून येत आहे. यावेळी त्यांच्या शरीरातून निळा प्रकाश बाहेर पडत आहे. आता माशांच्या शरीरातून बाहेर पडणारा हा प्रकाश काही साधा नसून हे एक दुर्लभ दृश्य आहे जे आपण कधीही पाहिले नाही. हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने त्याच्याशी संबंधित काही माहिती देखील शेअर केली आहे ज्यात सांगण्यात आले आहे की, हे चमकणारे मासे तैवानच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे परिणाम आहेत. ज्याने अलीकडेच असा शोध लावला आहे ज्याने जगभरातील लोकांचे लक्ष वेधले आहे. खरं तर, शास्त्रज्ञांनी कार्प माशांच्या डीएनएमध्ये जेलीफिशचे जीन मिसळून अंधारात प्रकाशाप्रमाणे चमकणारा मासा विकसित केला आहे. या अनोख्या कामगिरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाण्यात चमकणारे हे मासे आता सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Scientists in Taiwan added jellyfish genes to carp fish DNA resulting in glowing fish pic.twitter.com/E0KxaRCRTo
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) July 19, 2025
समुद्रकिनारी स्टंटबाजी करणं भोवलं! महागडी मर्सडिज घेऊन थेट पाण्यात घुसले तरुण ; पहा पुढं काय घडलं?
माशांवर प्रदूषणाचा काय परिणाम होतो हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तैवानच्या शास्त्रज्ञांचा हा प्रयोग केला आहे. शास्त्रज्ञांनी कार्प माशांच्या डीएनएमध्ये त्याचा समावेश केला आहे. या प्रक्रियेमुळे शास्त्रज्ञांना माशांच्या अवयवांमध्ये प्रदूषकांचा परिणाम प्रत्यक्ष वेळेत पाहण्यास मदत होते. बायोल्युमिनेसेंट, म्हणजेच जैविक चमक, माशांच्या शरीरात होणाऱ्या प्रक्रिया दृश्यमान करते. ज्यामुळे वातावरणात असलेल्या विषारी पदार्थांचा परिणाम सहजपणे अभ्यासता येतो. अनुवांशिक अभियांत्रिकीच्या तंत्राचा वापर करून, शास्त्रज्ञांनी कार्प माशांच्या डीएनएमध्ये जेलीफिशचे ते विशिष्ट जीन जोडले, जे प्रथिने तयार करतात. हे प्रथिने अंधारात चमकतात, ज्याला ग्रीन फ्लोरोसेंट प्रोटीन (GFP) म्हणतात. या प्रक्रियेत, माशांच्या शरीरात एक विशेष प्रकारचा प्रकाश तयार होतो, ज्यामुळे ते अंधारात चमकू लागतात.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.