ॲनाकोंडाने मगरीला घेतलं विळख्यात, पाण्याचा राक्षस तडफडत राहिला पण शेवटी जे घडलं...; भयंकर शिकारीचा Video Viral
निसर्गाचा नियम कुणाला चुकला नाही. इथे फक्त सर्वात बलवान शिकारी जिंकतात आणि हतबल झालेल्या लहान प्राण्यांचा आपला जीव गमवावा लागतो. जंगलातील लोकप्रिय शिकाऱ्यांमध्ये साप, सिंह, तसेच मगरीचा समावेश होतो. आपल्या बलाढ्य आणि चालक वृत्तीमुळे मगरीला पाण्याचा राक्षस ही उपमा दिली जाते. मात्र अलिकडेच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका ॲनाकोंडाने चक्क मगरीची शिकार केल्याचे दिसून आले आहे. ॲनाकोंडा आणि मगरीमधील भयंकर लढाईने लोकांच्या अंगावर काटा आणला आहे तर लोक वेगाने आता लढतीचा हा थरार शेअर देखील करत आहेत. यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये, एक महाकाय ॲनाकोंडा आणि एक मगर पाण्याजवळ एकमेकांशी झुंजताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मगर आणि एक ॲनाकोंडा साप एकमेकांभोवती घट्ट गुंडाळलेले आहेत. ॲनाकोंडा त्याच्या लांब आणि शक्तिशाली शरीराने मगरीचा गळा दाबताना दिसतो. तर मगर आपल्या जबड्याने सापाला इजा करण्याचा प्रयत्न करत आहे. पण सापाचा जोर मगरीवर इतका असतो की मगरीचे प्रयत्न काही निष्फळ होताना दिसून येत नाहीत. व्हिडिओतील लढतीचे हे दृश्य लोकांनी फार मजा घेत पाहिले.
ॲनाकोंडा हा जगातील सर्वात मोठ्या सापांपैकी एक आहे, जो त्याच्या भक्ष्याला चिरडून मारण्यासाठी ओळखला जातो. त्याचे स्नायू इतके मजबूत आहेत की ते मोठ्या प्राण्यांनाही सहज गिळू शकते. दुसरीकडे, मगर हा एक धोकादायक जलचर शिकारी आहे ज्याच्या जबड्याच्या ताकदीमुळे तो कोणत्याही भक्ष्याचे तुकडे करू शकतो. या व्हिडिओमध्ये दोघांची ताकद दिसून येते. जे यापूर्वी क्वचितच कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
लढतीचा हा व्हिडिओ @zarnab.lashaari नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे तर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “माझा प्रश्न असा आहे की तो ते कसे खाईल?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते मिठी मारत आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “फक्त बघण्यापेक्षा तुम्ही मदत करायला हवी होती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.