(फोटो सौजन्य – Pinterest)
लग्न ही संकल्पना प्रत्येक देशात सारखी असते. मात्र लग्नाचा हा सोहळा साजरा करण्याची पद्धत त्या त्या ठिकाणाहून बदलत जाते. लग्नाकडे दोन व्यक्तींचे आणि कुटुंबांचे मिलन म्हणून पाहिले जाते. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या संस्कृती आहेत जिथे लग्न वेगवेगळ्या रीतिरिवाजांनी आणि विधींनी केले जाते. बऱ्याच द या प्रथा आणि परंपरा इतक्या अनोख्या असतात की त्या आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात. चीनमध्येही अशीच एक परंपरा आहे जी ऐकताच तुम्ही चक्रावून जाल. यात नक्की काय घडते आणि ही परंपरा नक्की काय आहे याविषयी चला सविस्तर जाणून घेऊया.
“मी तुझे 200 तुकडे करीन”! बायकोने नवऱ्याला दिली जीवघेणी धमकी; पुढे काय घडलं? Video Viral
मुली मृतांशी करतात लग्न
चीनमध्ये मुला-मुलींचे लग्न लग्न कोणत्या मुलाशी नव्हे तर चक्क मृतांशी केले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये फक्त मुलींनाच ही पद्धत पाळावी लागते. चीनमध्ये ही असामान्य प्रथा भूत विवाह म्हणून ओळखली जाते. ही परंपरा सुमारे 3,000 वर्षे जुनी आहे, यात मृतांसोबत मुलींचे लग्न लावून दिले जाते. या भुताटकीच्या लग्नाच्या परंपरेमागील कारण अनेकांना आश्चर्यचकित करू शकते.
मृतांशी का लावले जाते लग्न?
अनुयायांचा असा विश्वास आहे की, यामुळे अविवाहित लोकांना मृत्यूनंतर एकटेपणापासून वाचवण्यासाठी मदत होते. या प्रथेत, जिवंत व्यक्ती मृतांशी लग्न करतात. जिवंत व्यक्तींसाठी मॅचमेकर करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे, चीनमध्ये मृत मुलाचे किंवा मुलीचे कुटुंब योग्य जोडीदार शोधण्यासाठी फेंगशुई मास्टरला कामावर ठेवते. त्यानंतर मृत व्यक्तीला स्मशानभूमीतून बाहेर काढले जाते, वधू किंवा वराच्या पोशाखात घातले जाते आणि औपचारिक समारंभात लग्न लावून दिले जाते. ही प्रथा प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळते. काही स्थानिकांचा असा विश्वास आहे की जर विवाहित महिलेची कबर एका अविवाहित पुरुषाच्या कबरीजवळ बांधली गेली तर तो पुढील जन्मात एकटा राहणार नाही.
असे लग्न खूप महाग असतात.
हे लग्न खर्चिक असतात, ज्यामध्ये कुटुंबे प्रचंड पैसा खर्च करतात. चीन सरकारने या लग्न पद्धतीला बेकायदेशीर ठरवले आहे मात्र तरीही काही भागात अजूनही हे असे भूत विवाह होतात. भूतविवाह ही चीनमध्ये एक अंधश्रद्धाळू प्रथा आहे ज्यामध्ये जिवंत व्यक्ती मृत्यूनंतरच्या जीवनात ब्रह्मचर्य संपवण्यासाठी आणि मृत व्यक्तीला एकटे वाटू नये यासाठी मृतदेहाशी लग्न करते.