(फोटो सौजन्य – Instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. इथे कधी अपघाताचे दृश्य व्हायरल होते, कधी जीवघेणे स्टंट्स तरी कधी विचित्र जुगाड.. . आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुमच्या कल्पनेपलीकडील आहेत. आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे जुगाडांच्या जोरावर आपले आयुष्य घालवत आहेत. कोणतीही गोष्ट ठीक करण्यापूर्वी आपण कोणत्या ना कोणत्या जुगाडाचा पर्याय पहिले निवडतो मात्र हे जुगाड कोणकोणत्या पातळीपर्यंत वापरले जात आहेत याचे जिवंत उदाहरण तुम्हाला आजच्या या व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळणार आहे.
आपले बूट बसत नाही म्हणून एका व्यक्तींने असा अनोखा जुगाड केला की पाहून सर्वच हैराण झाले. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक यातील दृश्ये पाहून चक्रावली आहेत तर काहीजण वेगाने हा व्हिडिओ शेअर करत आहेत. आता यात व्यक्तीने नक्की काय केलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसले व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये, एक माणूस त्याचे बूट आणि मोजे एका कुलुपाच्या मदतीने बंद करताना दिसत आहे. व्हिडिओत माणसाने तपकिरी रंगाचे बूट आणि क्रीम रंगाचे मोजे घातले आहेत. यावेळी तो आपल्या मोज्यावर कुलूप बसवताना स्पष्ट दिसून येतो. नंतर चवीने तो हे कुलूप बंद देखील करतो. आपले बूट पायातून निघू नये म्हणून व्यक्तीने हा जुगाड केलेला असतो. त्याचा हा जुगाड पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले असून लोक आता यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
जंगल तोड थांबवा! भर चौकात झाडाच्या वेषात तरुणाने माणसांना दाखवला आरसा, Video Viral
जुगाडाचा हा व्हिडिओ @maximum_manthan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘आता नाही निघणार बूट’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत तर काहींनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते सगळं ठीक आहे पण तू हे काकूंचे मोजे का घातले आहेत भाऊ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ, तू एखाद्या शास्त्रज्ञापेक्षा कमी नाहीस”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.