तो क्षण अखेरचा...! हसत खेळत नवऱ्या मुलाला हळद लावायला गेला अन् क्षणात होत्याच नव्हतं घडलं; हृदयस्पर्शी Video Viral
सोशल मीडियावर तुम्ही लग्नसोहळ्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यातील काही व्हिडिओ तुम्हाला हसवतात तर काही तुम्हाला आश्चर्यचकित करतात. अनेकदा आनंदाच्या भरात असे काही अपघात घडतात ज्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. असाच काहीसा प्रकार हैदराबादमध्ये एका लग्न समारंभात घडला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबादच्या काला पत्थर भागात लग्नसोहळा सुरू होता. यादरम्यान एक अशी घटना घडून येते जी क्षणात लग्नातील या हसते खेळते वातावरण दुःखात बदलते.
आजकाल अनेक लोक हे अकस्मात मृत्यूला बळी पडत आहेत. कोणत्या वेळी कुणाचं काय होईल ते सांगता येत नाही. याचीच प्राचीची देणारा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. यातील दृश्ये तुम्हाला क्षणात आश्चर्याचा धक्का देतील. वास्तविक, यात चालू हळदीच्या कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याचे दिसते. यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू होतो. मुख्य म्हणजे, ही व्यक्ती वराला हळद लावायला जात असते. हळद हातात घेताच तो वराला हळद लावणार तितक्यात काही सेकंदातच त्याचा मृत्यू होतो. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा हृदयद्रावक प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. आता या धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला हळदी सोहळ्यातील आनंदाचे वातावरण दिसून येईल. वराच्या समोर एक व्यक्ती बसलेली असते. ही व्यक्ती हसत वराला हळद लावण्यासाठी त्याच्याजवळ येते. पण हळद लावणार तितक्यातच नवरौ मुलासमोर तो अचानक जमिनीवर पडतो. हा सर्व प्रकार पाहून वर मुलगाही घाबरतो आणि तिथे एकच गोंधळ होतो. व्हिडिओच्या बॅग्राऊंडमध्ये एका मुलाच्या रडण्याचा आवाजही ऐकू येत आहे. या व्यक्तीचे नाव रब्बानी असून घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाही आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत्यूचा हा जीवघेणा थरार @mylifejhand143 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “माझी मृत्यूला विनंती आहे की अशा सुखाच्या कधीच येऊ नको” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हसत हसत देवाला प्रिय झाले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.