
Child Falls from Moving Luxury Bus, Driver's Quick Action Saves His Life ( चालत्या लक्झरी बसमधून मूल खाली पडले; चालकाच्या तत्परतेमुळे जीव वाचला )
बस चालकाने वेळेत दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि प्रसंगावधानाने एक मोठी दुर्घटना टळली; चालकाने त्वरित बस थांबवली आणि त्या मुलाला उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून तो व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय.
माता-पिता सावधान रहें!🔴
बस से सफर के दौरान एक बच्चा नीचे गिर गया। ऐसी घटनाएं दिल दहला देती हैं। खासकर सूरत से आने-जाने वाले लोग अपने बच्चों का…read more https://t.co/O7iBMKoKCV — Somdutt Yadav (@Somdutt995311) November 11, 2026
मिळालेल्या माहिती नुसार धावत्या बसमध्ये एक मुलगा खेळत होता. लक्झरी बसचा दरवाजा उघडा होता. या दरम्यान हा मुलगा खेळता खेळता बसच्या उघड्या दरवाजाच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचला. सुदैवाने, चालक आणि इतर प्रवाशांनी त्याला वेळीच पाहिले आणि मुलाच्या आईला सावध करण्यासाठी तात्काळ आवाज दिला, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. आणि या मुलाचा जीव वाचला.
प्रवासादरम्यान आपल्या मुलांवरून आपली नजर कधीही हटू देऊ नका; तुमची एक छोटीशी खबरदारी एक मोठी दुर्घटना टाळू शकते.
सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. या मध्ये सोशल मिडिया युजर्सने मोठ्या प्रमाणात आपले मत व्यक्त केले आहेत.
सोशल मिडिया युजर्सने म्हटले आहे की, “मुलांच्या सुरक्षेबाबतचा अगदी थोडासा निष्काळजीपणाही महागात पडू शकतो. पालक आणि बस चालक या दोघांनीही विशेष दक्षता बाळगली पाहिजे. मुलांचा सुरक्षित प्रवास ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ”
” दरवाजा उघडा ठेवून बस चालवणे हे अत्यंत धोकादायक आहे; मुलाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.”
” प्रत्येक मुलाची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. अशा हृदयद्रावक घटना टाळण्यासाठी पालक आणि वाहतूक प्राधिकरणांनी सतर्क राहिले पाहिजे.”
Ans: घटना गुजरातमधील सुरत शहरात बस मध्ये घडली.
Ans: धावत्या लक्झरी बसमध्ये खेळत असताना मुलगा उघड्या दरवाजाच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचला आणि खाली पडला.
Ans: माहितीनुसार, सुदैवाने मुलाचा जीव वाचला. दुखापतीबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.