(फोटो सौजन्य: instagram)
सोशल मीडियावर तुम्हाला अनेक मनोरंजक व्हिडिओ पाहायला मिळातात. यात कधी स्टंट्स दाखवले जातात, कधी अनोखा जुगाड तर कधी अपघाताचे दृश्य. यासोबतच इथे बऱ्याचदा प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ देखील शेअर केले जातात. हे व्हिडिओ लोकांच्या मनोरंजनाचे काम करतात. प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित हे व्हिडिओ लोकांना फार आवडतात ज्यामुळे ते कमी वेळातच व्हायरल होतात. आताही इथे पाणगेंडा आणि सिंहातील मजेदार लढतीचा एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे. याचा शेवट आता अनेकांना थक्क करत आहे.
आपल्या बलाढ्य शक्तीमुळे सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते. त्याच्या शक्तीपुढे भल्याभल्यांना घाम फुटतो. प्राणीच काय तर माणसंही त्याला घाबरून असतात. अशातच नुकताच सिंह आणि पाणगेंड्यातील एका मजेदार लढतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यात सिंह नव्हे तर पाणगेंडाच सिंहाची हवा टाइट करताना दिसून आला. हे दृश्य पाहून बाजूला उभी असलेलीच सिंहीण देखील थक्क झाली. व्हिडीओत नक्की काय काय घडून आले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
सध्या सिंह आणि गेंड्याच्या लढतीच्या व्हिडिओने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला सिंह आणि गेंडा यांच्यातील जबरदस्त झुंज पाहायला मिळेल. सिंह आणि गेंड्याची ही फाईल पाहून तुम्ही हादरून जाल. सिंह हा जंगलाचा राजा आहे, पण कधी कधी त्यालाही माघार घ्यावी लागते. हा व्हिडीओ एका निर्जन ठिकाणचा आहे, जिथे एक सिंह आणि सिंहीणी फिरत आहेत. त्याच क्षणी त्यांना एक पाणगेंडा जाताना दिसतो. गेंड्याला कमकुवत समजून सिंह पटकन त्याच्याकडे जातो आणि त्याच्यावर हल्ला करतो. यादरम्यान, पाणगेंडा त्यावर पलटवार करतो आणि आपल्या शिंगांनी सिंहावर हल्ला करतो. त्याच्या तीक्ष्ण शिंगांमुळे सिंह त्याला घाबरून पळत पळत मागे जातो. सिंहाचे असे घाबरणे बाजूला उभ्या असलेल्या सिंहिणीलाही थक्क करते आणि तो दुरूनच हे सर्व दृश्य पाहत राहते.
पाणगेंडा आणि सिंहाच्या या संघर्षाचा व्हिडिओ @wildtrails.in नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘लढाईसाठी तुमचा विरोधक म्हणून कोणाची निवड कराल याची काळजी घ्या’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहले आहे, “तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका, जर तुमचा मृत्यू झाला तर तिच्याशी लग्न करण्यास कोणीतरी तयार आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करता करता जंगलाच्या राजाने जवळजवळ स्वतःलाच मारून टाकले होते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.