अरे हा माणूस आहे की कुत्रा! संपूर्ण शरीर केलं ट्रान्सफॉर्म, भयावह दृश्य... पाहून तुम्हीही व्हाल शॉक; धक्कादायक Video Viral
आजकाल तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की माणसाचं ज्ञान त्यापुढे लहान होत चाललं आहे. आपल्याला हवं ते आणि हवं तसं आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने काहीही करू शकतो. मागील काही काळापासून प्लास्टिक सर्जरी खूप ट्रेंडमध्ये आहे. बहुतेक सेलेब्रिटी लोक प्लास्टिक सर्जरीचा वापर करून आपले सौंदर्य आणखीन वाढवून घेतात. कोणाला आपल्या नाकाचा आकार आवडत नसेल, ओठ मोठे करून हवं असेल तर अशा सर्वच गोष्टी प्लास्टिक सर्जरीच्या मदतीने करता येतात. याच्या मदतीने आपण फुल बॉडी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच आपले संपूर्ण शरीर हवं तसं बदलू शकतो पण नुकताच प्लास्टिक सर्जरीचा एक अनोखा चमत्कार सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो जोरदार चर्चेला विषय बनला आहे. व्हिडिओमध्ये एक कुत्रा दिसून येत आहे ज्याचा चेहरा झुम करताच तो माणसाप्रमाणे दिसू लागतो आणि एक नवे भयानक सत्य सर्वांच्या समोर येते.
व्हिडिओमध्ये दिसणारा प्राणी विचित्र पद्धतीने डिझाइन केलेला आहे, त्यावर खास टॅटू आहेत. तो एका कुत्र्याप्रमाणे दिसत आहे पण कॅमेरा झूम करताच त्याचा चेहरा मानवी दिसतो. तो मानव आहे की एलियन हे पाहणाऱ्यांना गोंधळात टाकते. तथापि, जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला आढळेल की त्या प्राण्याचे पुढचे पाय मानवी हातासारखे आहेत आणि व्यवस्थित पाहिल्यास चेहरा मानवी दिसतो आणि डोळे देखील मानवी दिसतात. व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यानुसार एका व्यक्तीने आपले बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करून स्वतःचे एका कुत्र्याच्या रूपांतर केले आहे तर कमेंट्समध्ये काही लोक याला AI क्रिएटेड व्हिडिओ असल्याचे म्हणत आहेत. यातील काय खरं, काय खोटं याचं उत्तर मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @thehauntingearth नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. दरम्यान आम्ही तुम्हाला सांगतो की, ‘टोको’ नावाच्या माणसानेही असेच केले. त्याने बॉर्डर कॉली कुत्र्याचा एक अति-वास्तववादी पोशाख बनवण्यासाठी ₹१२ लाख (१४,००० डॉलर्स) खर्च केले आणि आता तो कुत्र्यासारखा समाजात राहतो.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.