(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. इथे बरेच अनोखे व्हिडिओज व्हायरल होत असतात ज्यांना पाहून आपल्याला हसू येईल किंवा आपल्याला आश्चर्याचा धक्का मिळेल. फक्त माणसांचेच नाही तर प्राण्यांचीही बरेच व्हिडिओ इथे व्हायरल होतात जे आपल्या मनोरंजनाचे काम करतात अशात सध्या सोशल मीडियावर एक नवीन आणि मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक वाघ शिकारीच्या उद्देशाने एका महिलेवर झडप घालायचा प्रयत्न करतो पण बिचाऱ्याची चपळता इथे कामी येत नाही अन् क्षणातच त्याचा असा पचका होतो की पाहून सर्वांनाच हसू अनावर होते. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वाघासारख्या चपळ आणि बलाढ्य शिकाऱ्याची झालेली ही हार आणि त्याची फजिती आता सोशल मीडियावर वेगाने शेअर केली जात आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घ्या.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक सफेद रंगाचा वाघ दबक्या पावलांनी पुढे जाताना दिसून येतो. आपल्या शिकारी नजरेत निशाणा साधत तो हळूहळू पुढे जाऊ लागतो आणि कॅमेरा पुढे सरकताच त्याने पुढे एका बाकड्यावर बसलेल्या महिलेवर निशाणा साधल्याचे स्पष्ट होते. महिलेला पाहताच वाघाला आपली भूक अनावर होते आणि महिलेची शिकार करण्याच्या उद्देशाने तो शिकारीचा डाव मांडतो पण त्याला काय ठाऊक की पुढच्याच क्षणी त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटा पडतो आणि वाघाची मजेदार फजिती होते. घडतं असं की वाघ जसा महिलेच्या जवळ जातो तो मागून तिला खाण्यासाठी आपले तोंड उघडून तिच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्न करतो पण तिथे एक ट्रान्सपरंट ग्लास लावलेली असते ज्यामुळे तो महिलेपर्यंत पोहचत नाही आणि त्याची मजेशीररित्या फजिती होते. खरंतर ग्लासच्या एका बाजूला वाघ आणि दुसऱ्या बाजूला महिला पण वाघाला ही ग्लास दिसत नाही ज्यामुळे कितीही प्रयत्न करूनही त्याला महिलेवर हल्ला करता येत नाही आणि फक्त डोळ्यांनीच आपली भूक शमवावी लागते.
वाघाच्या फजितीचा हा व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे वाघ आहे तो त्याच्यासोबत असं करू नका” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते म्हणतात हाती आलं पण तोंडी नाही लागलं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरेरे मला त्याच्यासाठी वाईट वाटतं आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.