(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर बऱ्याच अशा घटना शेअर केल्या जातील ज्यातील दृश्ये आपल्या अंगावर काटा आणू शकतात. आताही इथे अशीच एक घटना व्हायरल झाली आहे ज्यात एका महाकाय अजगराने सर्पमित्रावर हल्ला चढवल्याचे दिसून आले आहे. हा काय साधा सुधा हल्ला नसून अजगर तब्बल ४० सेकंद व्यक्तीच्या गालाचा चावा घेत त्याला चिपकून राहतो. व्यक्तीला असह्य वेदना होत राहतात पण कुणालाही यात काहीच करता येत नाही आणि आता याच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अजगराची व्यक्तीकडे जबरदस्त झेप अन् व्यक्तीची तडफड स्पष्टपणे दिसून येते. व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक हातमोजे घातलेला एक व्यक्ती एका मोठ्या अजगराला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. असे दिसते की गावकऱ्यांनी या मोठ्या सापाला पकडण्यासाठी या सर्पमित्राला बोलावले होते. पण अजगराला पकडण्यासाठी आलेल्या या सर्पमित्रावरच अजगर भयानक हल्ला करतो. अजगर जाळ्यात अडकला होता आणि दुसऱ्या एका व्यक्तीने त्याची शेपटी धरली होती. पण अजगराला पकडण्याआधीच तो उंच उडी मारत व्यक्तीच्या अंगावर चढतो आणि त्याच्या गालावर जोरदार दंश करतो. तब्बल ४० सेकंद अजगर व्यक्तीच्या गालाचा चावा घेत राहतो. हे सर्वच इतके थरारक दिसत होते की तिथे उपस्थित लोकही यामुळे घाबरतात पण काही लोक सर्पमित्राच्या मदतीसाठी पुढे येतात ज्यामुळे अजगराच्या तावडीतून त्याची सुटका करण्यात येते. दरम्यान ही घटना नक्की कुठली आणि कधीही आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
सदर घटनेचा व्हिडिओ @therealtarzann नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अजगरही बोलत असेल मी तुझ्यामध्ये गुंतून गेलो आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अजगराला किस द्यायची होती” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की ते विषारी होता की नाही?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.