Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नशीबच फुटकं त्याला काय करणार! तरुणींची मदत करायला गेला अन् होत्याच नव्हतं करून बसला, Video Viral

अंगात नाही करणी आणि म्हणे स्वतःला तरणी! तरुणाची मदत मुलींना चांगलीच महागात पडली. पाहून तुम्हीही डोक्याला लावाल हाथ. घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून यात नेमकं काय घडलं ते एकदा पाहाच

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 24, 2024 | 02:46 PM
नशीबच फुटकं त्याला काय करणार! तरुणींची मदत करायला गेला अन् होत्याच नव्हतं करून बसला, Video Viral

नशीबच फुटकं त्याला काय करणार! तरुणींची मदत करायला गेला अन् होत्याच नव्हतं करून बसला, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

एखाद्याला मदत करणे ही फार चांगली गोष्ट आहे. आपल्याला लहानपणापासूनच इतरांना सहकार्य करण्याचा, मदत करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र बऱ्याचदा आपण मदत करायला किंवा काही काम करायला गेलो की नको ते घडून बसते. असे झाले की, बहुतेक लोक आपल्या नशिबाला जबाबदार ठरवतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले आहे. यात एक तरुण दोन महिलांची मदत करायला जातो पण घडते काही भलतेच. ही मदत त्याला चांगलीच महागात पडते. व्हिडीओत नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊयात.

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात काही अपघातासंबंधित व्हिडिओ असतात तर काही थरारक स्टंट्सचे व्हिडिओ यात सामील असतात. मात्र सध्या एका अजब प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातील दृश्ये आणि तरुणाचे नशीब बघून तुम्हीही डोक्याला हाथ लावाल. यात तरुणींची स्कुटी रस्त्यावर उलटी पडल्याने एक तरुण त्यांना मदत करायला जाताना दिसून येतो. मात्र घडते काही भलतेच, तरुण जातो तर तरुणींची मदत करण्यासाठी मात्र मदत न करता तो त्यांची चिंता आणखीनच वाढवून येतो.

ते ओरडत राहिले पण…! ट्रकखाली अडकलेल्या दोघांना 500 मीटरपर्यंत ओढत राहिला ड्रायव्हर, थरारक घटनेचा Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही नीट पाहिले तर यात दिसते की, दोन तरुणी स्कुटीवरून येत आहेत. यावेळी अचानक त्यांचा तोल ढासळतो आणि या तरुणी स्कुटी घेऊन रस्त्याच्या कडेला पडतात. त्यानंतर त्या जागेवरून उठतात. त्यांची स्कुटी यावेळी जमिनीवर पडलेली असते. त्या काही करतील तितक्यात तिथे एक तरुण पळत येतो आणि त्यांची मदत करण्याच्या उद्देशाने स्कुटी उचलण्याचा प्रयत्न करू लागतो. तरुण स्कुटी उचलतो पण चुकून त्याचा हात एक्सीलेटरवर पडतो ज्यामुळे स्कुटी नदीच्या दिशेने पुढे जाऊ लागते. यानंतर हा तरुण स्कुटी घेऊन नदीत पडतो. स्कुटी उचलण्यासाठी आलेला हा तरुण थेट तरुणींची स्कुटी पाण्यातच फेकून टाकतो. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक या व्हिडिओची फार मजा घेत आहेत.


तुझा बाप आहे मी! सिंहाचं पिल्लू देत होतं वडिलांना त्रास, तितक्यात सिंहाने केलं असं… Video Viral

या सर्व प्रकारचा व्हिडिओ @yogeshkamble27 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘भाऊला परत कुणाची मदत करायची इच्छाच होणार नाही. भाऊ मदत करायला गेला होता’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला अनेकांनी पाहिले असून बऱ्याच लोकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “टेन्शन नका घेऊ भाऊ गाडीला अघोळ घालायला गेला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मिशन यशस्वीरित्या अयशस्वी”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: A man tries to help girls who fell off their scooty watch what happened next watch viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 02:46 PM

Topics:  

  • funny viral video
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
1

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
2

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

खारुताई आणि सापाची फाईट कधी पाहिली आहे का? एकमेकांविरुद्ध भिडले अन् मग जे घडलं… मजेदार Video Viral
3

खारुताई आणि सापाची फाईट कधी पाहिली आहे का? एकमेकांविरुद्ध भिडले अन् मग जे घडलं… मजेदार Video Viral

म्हणून दुसऱ्याच्या घरात घुसू नये! बिबट्याला पाहताच महिलेने त्याला असं फरफटत आत खेचलं… जंगलाचा शिकारी पण घाबरला; Video Viral
4

म्हणून दुसऱ्याच्या घरात घुसू नये! बिबट्याला पाहताच महिलेने त्याला असं फरफटत आत खेचलं… जंगलाचा शिकारी पण घाबरला; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.