सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी भावुक करतात तर कधी थक्क करून जातात. इथे प्राण्यांच्या जीवनाशी निगडित देखील काही व्हिडिओ शेअर केले जातात. सध्या जंगलाच्या राजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये सिंहाचे पिल्लू वडिलांची छेड काढताना दिसून येत आहे. मात्र यावर सिंहाची जी प्रतिक्रिया असते ती पाहण्यासारखी आहे. अनेकजण या व्हिडिओची या व्हिडिओची मजा लुटत असून हा हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
सिंह हा मुळातच एक धोकादायक आणि जीवघेणा प्राणी आहे. त्याच्या थरारक शिकारीमुळे आणि ताकदीमुळे त्याला जंगलाचा राजा संबोधले जाते. आपल्या शिकाऱ्याला मिळवण्यासाठी तो वाटेल त्या थराला जाऊ शकतो. अशात प्राणीच काय तर माणसंही त्याला घाबरून असतात. पण राजा कितीही खतरनाक असला तरी कुटुंबासमोर मात्र त्याचं काही चालत नाही. लहान मुलांचा खोडकरपणा आपण जाणून आहोत, हा खोडकरपणा प्राण्याच्या पिल्लांमध्येही दिसून येते. आता हेच बघा ना सिंहाच्या पिल्लू शांत झोपी गेलेल्या आपल्या वडिलांची खोड काढायला जातो आणि मग पुढे काय घडते ते तुम्हीच व्हिडिओतून जाणून घ्या.
आजी-आजोबांच्या शोकसभेत आयटम सॉंगवर नाचू लागली तरुणी, युजर्स भडकले म्हणाले आईची आत्मा… Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये, एक सिंह रस्त्याच्या कडेला अगदी शांतपणे आपल्या झोपेचा आनंद लुटत असतो. यावेळी त्याची पिल्लं देखील त्याच्यासोबत इथे असतात. तेवढ्यात आपण पाहतो की, सिंहाचे पिल्लू हळूहळू गुपचूपपणे झोपी गेलेल्या सिंहाच्या जवळ जातो आणि त्याच्या शेपटीला चावून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. आता सिंह हा सिंहच शेवटी, तो ही मजा अशी तशी थोडीच खपवून घेईल. सिंहाची झोपमोड करताच तो भडकतो आणि त्याला डरकाळी फोडत त्याला दूर जाण्यास सांगतो. आपल्या वडिलांना भडकल्याचे पाहून पिल्लू देखील दूर पळून जाते. दरम्यान पिल्लाच्या या गोड खोडकरीचा व्हिडिओ लोकांना मात्र फार आवडला आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @Latestsightings नावाच्या युट्युब अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘वडिलांची शेपटी का चावू नये याचा धडा सिंहाच्या पिल्लाने शिकला’ असे लिहिले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सिंह छान शांततेच्या दुनियेत रामला आहे, जिथे मानव नाहीत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पिल्लांना वाटते की त्यांच्या वडिलांची शेपटी हे एक खेळणं आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.