AI रोबोटला राग झाला अनावर, गर्दीत शिरून महिलेला केली मारहाण, पाहून तुम्हीही दंग व्हाल; Video Viral
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आजकाल आपल्या दैनंदिन आयुष्यातील सर्व गोष्टी उपकरणांच्या मदतीने सहज होतात. आपले वास्तविक आयुष्य हे टेक्नॉलॉजीने भरलेलं आहे. येत्या काळात आहे रोबोट्सची फार चर्चा होऊ लागली. काही वर्षात रोबोट्स आपल्या जीवनाचा एक भाग बनतील असे म्हणायला काही हरकत नाही. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा आपल्याला महागात पडू शकतो. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यातील धक्कादायक दृश्ये तुम्हाला हैराण करतील. यात एका AI रोबोटने चक्क एका महिलेला भर कार्यक्रमात मारहाण केली आहे. नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
चीनच्या तिआनजिन शहरात आयोजित ‘स्प्रिंग फेस्टिव्हल गाला’ दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. इथे एका ह्युमेनाईड रोबोटने रागात एका महिलेवर हल्ला चढवला. ही घटना 9 फेब्रुवारी रोजी घडली होती, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की रंगीबेरंगी कपडे घातलेला एक ह्युमनॉइड रोबोट अचानक त्याच्या जागेवरून बाहेर येतो आणि प्रेक्षकांच्या दिशेने धावू लागतो. यानंतर तो एका महिलेजवळ जातो आणि तिला मारायला लागतो.
विशेष म्हणजे, यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत त्याला नियंत्रणात आणायचा प्रयत्न केला मात्र त्याच्या ताकदीपुढे ते असफल पडले. ज्यामुळे नंतर त्याचा एमरजंसी बटन दाबून त्याला स्विच ऑफ करण्यात आले. ही संपूर्ण घटना तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेरात कैद केली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जो आता वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे आता AI टेक्नोलॉजी कशी माणसांच्या जीवावर बेतू शकते याची चर्चा रंगू लागली आहे. आयोजकांनी मात्र याला रोबोटिक फेलियरचे कारण सांगितले आहे.
🇨🇳 Meanwhile in China
Ai Robot malfunctions & attacks person before being restrained
A quick glimpse into what the future holds for all of us…. pic.twitter.com/t99wwbqWOO
— Concerned Citizen (@BGatesIsaPyscho) February 20, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @BGatesIsaPyscho नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत 4 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “चीन कारखान्यांमध्ये उर्वरित जगाच्या एकत्रित तुलनेत अधिक रोबोट इंस्नस्टाॅ करतो. यामुळे लाखो कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो चुकीच्या दिशेने जाताना अडकला असे दिसते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.