(फोटो सौजन्य: Twitter)
या जगात आईचे नाते सर्व नात्यातून फार वेगळे असते. इतर वेळी आपल्याला माया लावणारी आई संकटात मात्र रणरागिणीचे रूप घेते. आपल्या मुलावर आणि कुटुंबावर ती एकही संकट येऊ देत नाही. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी एक आई कोणत्याही थराला जाऊ शकते असे म्हटले जाते मात्र याचे जिवंत उदाहरण सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. यामध्ये एक आई आपल्या पाच वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालते आणि कुत्र्याला झुंज देऊ लागते. आता यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ रशियाच्या येकातेरिनबर्ग येथील आहे. येथे एका Rottweiler जातीच्या कुत्र्याने अचानक आई आणि मुलावर हल्ला केला. आपल्या 5 वर्षाच्या चिमुरड्याला कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी एका आईने स्वतःच्या शरीराचा ढाल म्हणून वापर केला. या प्रयत्नात आईही जबर जखमी झाली. ती रक्ताच्या थारोळ्यात भिजली पण ढालीसारखी मुलावर पडून राहिली. व्हिडिओच्या शेवटपर्यंत ही आई थंडीने कुडकुडत मुलालाझाकून कुत्र्यापासून त्याचा बचाव करताना दिसली.
यावेळी त्यांच्या कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने याचा व्हिडिओ शूट केला. कुत्र्याची दहशत राहता त्या व्यक्तीनेही कारच्या बाहेर येण्याचे धाडस दाखवले नाही आणि दुरूनच तो हे सर्व दृश्य पाहू लागला. ज्यावर आता अनेक सोशल मीडिया युजर्सने संताप व्यक्त केला आहे. रॉटविलर जातीचे कुत्रे हे फार आक्रमक असतात ज्यामुळे त्यांचा हल्ला हा काही साधा नाही. असे कुत्रे पाळणे म्हणजे जीवाला धोकाच देणे…
Mom shields her 5yo kid with her OWN body to protect from Rottweiler attack
She suffers wounds and open fracture, blood stains snow in Russia’s Yekaterinburg
Investigation underway — should dangerous dogs require a license to own? pic.twitter.com/16ZgD3zlTI
— RT (@RT_com) February 26, 2025
मानव आणखीन किती क्रूर होणार? श्वानाला भरलं पोत्यात अन्… माणुसकीला काळिमा फासणारा Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @RT_com नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर कारण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 16 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “Rottweiler जातीचा कुत्रा ठेवण्यासाठी लायसन्स आवश्यक आहे. हे फक्त पाळीव प्राणी नाही तर ते एक शस्त्र आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती आई एक हिरो आहे आणि कारमध्ये बसून याचा व्हिडिओ बनवणारा तो व्यक्ती एक लुजर आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.