पतिसोबत भांडण होताच पत्नी थेट विजेच्या टॉवरवर जाऊन बसली, तब्बल 4 तास सुरु राहिला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral
सोशल मीडियावर सध्या एक अनोखा हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल मोठ्या प्रमाणात होत आहे. यातील दृश्ये तुम्हाला थक्क करू शकतात. यात भांडणाला कंटाळून एका पत्नीने असेकाही केले की पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरली. मुळातच नवरा-बायकोच्या नात्यात वाद, भांडणं, रुसवे फुगवे होणे सामान्य आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर एक अजब प्रकार व्हायरल झाला आहे ज्यात पतिसोबतच्या भांडणांनंतर पत्नी थेट विजेच्या टॉवरवर जाऊन बसल्याची घटना घडली आहे. या घटनेने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात धुमाकूळ माजली. नवऱ्याने आणि गावकऱ्यांनी महिलेला समजावण्याचा फार प्रयत्न केला मात्र तरीही तिने कोणाचेही काही ऐकले नाही. तब्बल चार तास हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरु राहिला आणि त्यांनतर ही महिला विजेच्या टॉवरवरून खाली उतरली. काही वेळाने लालापूर पोलिसांना माहिती मिळताच एसीपी बारा संतलाल सरोज आणि पोलिस स्टेशन प्रमुख लालापूर अजयकुमार मिश्रा घटनास्थळी पोहोचले. त्याने टॉवरवरून खाली उतरण्यासाठी महिलेची समजूत घालण्यास सुरुवात केली. रात्री 12 वाजल्यापासून टॉवरवर चढणाऱ्या महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा तब्बल चार तास सुरू होता. सायंकाळी चार वाजता पोलिसांची समजूत घातल्यानंतर महिलेने खाली उतरण्यास सुरुवात केल्यानंतर काही अंतरावर तिचे हात-पाय सुजले, त्यानंतर पोलिसांनी टॉवरवर चढून तिला दोरीच्या साहाय्याने खाली आणले.
🚨Drama in #Prayagraj!
A woman, upset with her husband, climbed an electricity tower. A brave policeman intervened and safely brought her down. pic.twitter.com/vz0cM8Zifv
— Backchod Indian (@IndianBackchod) March 19, 2025
ती एक चूक… जीवघेणी ठरली! ट्रेनने तरुणाला अक्षरशः 500 मीटरपर्यंत फरफटत नेले, घटनेचा थरारक Video Viral
खाली उतरताच पत्नीने पातीवर अनेक आरोप केले. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून लोक घटनेतील दृश्य पाहून हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर अनेकजण यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत तसेच अनेकांनी पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. घटनेचा व्हिडिओ @IndianBackchod नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पतीवर नाराज असलेली एक महिला विजेच्या टॉवरवर चढली. एका धाडसी पोलिसाने हस्तक्षेप करून तिला सुरक्षितपणे खाली आणले’ असे लिहिण्यात आले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.