(फोटो सौजन्य: Instagram )
सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे प्राण्यांच्या लढतीचे दृश्य पाहायला मिळतात. आताही इथे अशीच एक लढत व्हायरल झाली आहे ज्यात जॅग्वार प्राण्याने पाण्याचा राक्षस म्हणजेच मगरीवर हल्ला केल्याचे दिसून आले. पाण्यात मुळातच मगरीचे राज्य असते अशात तिच्याच वेशीत जाऊन तिच्यावर हल्ला करणं काही सोपं नाही. या थरारक लढतीचे दृश्य पाहून अनेकजण हादरले, याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृश्ये आता अनेकांना थक्क करत आहेत.
स्पायडर मॅन बनत स्टंट करू पाहत होतं कपल, मग जे झालं… क्षणार्धातच सगळी हिरोगिरी उतरली; Video Viral
जॅग्वारला अमेरिकन टायगर असेही म्हणतात, कारण जमिनीवर आणि पाण्यात शिकार करण्याची त्याची अद्भुत क्षमता आहे. जग्वारला अमेरिकन टायगर असेही म्हणतात, कारण जमिनीवर आणि पाण्यात शिकार करण्याची त्याची अद्भुत क्षमता आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जॅग्वार पाण्यात पोहत असलेल्या मगरीवर अचानक कसा हल्ला करतो. हे दृश्य खरोखरच धक्कादायक होते आणि ते पाहून लोक थक्क झाले. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून तो पाहून लोक हैराण झाले आहेत.
व्हिडिओमध्ये, जॅग्वारप्रथम शांतपणे तलावाच्या काठावर पोहोचतो. मगरीला पाण्यात पोहत असल्याचे पाहताच तो ताबडतोब मगरीवर हल्ला करण्यास सज्ज होतो. जॅग्वार पाण्यात उडी मारतो आणि वेळ न घालवता मगरीची मान पकडतो. मगरीला यावेळी काहीही करता येत नाही. जॅग्वारने त्याला इतक्या वेगाने पकडले की तो काहीच करू शकला नाही. यानंतर जॅग्वार त्याला पाण्यातून बाहेर काढतो आणि जंगलात घेऊन जाऊ लागतो. जॅग्वारचा हा व्हिडिओ आता इंटरनेटवर खळबळ उडवत आहे. या व्हिडीओवर नेटिझन्स विविध प्रकारच्या कमेंट करत असून तो पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे. एका युजरने तर ‘जॅग्वार वाघापेक्षाही धोकादायक आहे’ असे म्हटले आहे.
जंगलातील या हल्ल्याचा थरार @norcmeal नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून काहींनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जॅग्वार निसर्गाचा सुलतान आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मगर विचार करत असेल, आत ये, मी तुला फसवतो!! त्याला पश्चात्ताप झाला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.