After India's Operation SindoorAIMIM's Owaisi video goes viral
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीमेंतर्ग पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. पहलगामच्या भ्याड हल्ल्यात बळी गेलेल्या निरापराधांच्या हत्येचा बदला अखेर भारताने घेतला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान सोशल मीडियावर AIMIM पक्षाचे प्रमुख औवीसी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये औवेसी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करतना दिसत आहेत. तसेच भारताचा जय जयकारही औवीस करत आहेत. या व्हिडिओत औवेसी पाकिस्तान मुर्दाबाद, भारत जिंदाबाद अशी घोषणाबाजी करत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहीमेच्या यशानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. दहशतवाद्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारुन त्यांची हत्या केली होती. या हल्ल्यात बळी गेलेल्यांना न्याय देण्याचा निराधार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. त्यांनी म्हटले होते की, भारत या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल. अखेर 6 मेच्या मध्यरात्री 1.30 वाजता भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली. भारताच्या लष्कर, नौदल आणि वायुदलाने संयुक्तपणे ही कामगिरी बजावली. नरेंद्र मोदींनीच ऑपरेशन सिंदूर हे नाव मोहीमेला दिले.
या कारवाईनंतर देशात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. लोकाना भारत माता की जय!, जय हिंद!, भारतीय सैन्याचा विजय असो! पंतप्रधान मोदींचा जयजयकार केला. तसेच पाकिस्तान मुर्दाबाद अशा पाकिस्तानविरुद्ध घोषणाही दिल्या.
पूरा देश जहाँ देशभक्ति दिखाने में लगा है वही राष्ट्रवाद की नींव को मजबूत करने में @asadowaisi ने भी कोई कमी नहीं छोड़ी
पाकिस्तान ही नहीं देश में भी ओवैसी की राष्ट्रीय विचारधारा कइयों को परेशान कर रही हैऐसे ही संदेश व्यक्ति को नेता नहीं लीडर बनाते है
— JituSir_29 (@JituSir_29) May 7, 2025
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.