(फोटो सौजन्य – Instagram)
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिउत्तरार्थ भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले, ज्याअंतर्गत भारताने लष्कराने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. तिन्ही सैन्य – वायुदल, नौदल आणि लष्कराने मिळून केलेले हे एक संयुक्त ऑपरेशन होते. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानमधील ४ आणि पीओकेमधील ५ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. हा हवाई हल्ला यशस्वी झाल्यांनतर सोशल मीडियावर अनेक मिम्स आणि रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्या. यातच आता इंटरनेटवर आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एअर डिफेन्स सिस्टीम कशी काम करते ते दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक आता त्याला शेअर देखील करत आहेत. यात नक्की काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून शकता, यात एअर डिफेन्स सिस्टीम सतत रॉकेट डागत आहे आणि गोळीबार करत आहे तर एक लढाऊ विमान आकाशात उडत आहे. रॉकेटपासून वाचण्यासाठी, जेटचा पायलट विमान इकडे तिकडे हलवत आहे पण तो जास्त काळ त्यातून सुटू शकत नाही. शेवटी, रॉकेट जेटला धडकते आणि मोठा स्फोट होतो. व्हिडिओतील हे दृश्य रोमांचक असून ते लोकांना हवाई हल्ल्यात उपकरणे कशी काम करतात याची माहिती देते. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले केल्यापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @1__9__9___7 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून अनेक अकाउंट्स या व्हिडिओला रिपोस्ट देखील करत आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करत असून लोक आता यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ” हा फेल व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप भारी”. दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर एअरस्ट्राईक संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्याबद्दल लोक वेगवेगळे दावे केले जात आहेत मात्र याबाबतची सत्यता अजूनही गुलदस्त्यातच आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.