किती तो निष्काळजीपणा! रस्त्याच्या कडेला लावलेला लोखंडी बॅरिकेट वृद्ध महिलेच्या अंगावर कोसळला; Video Viral
मुंबईमध्ये सध्या जोरात रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू असून, शहराच्या अनेक भागांमध्ये रस्ते खोदले गेले आहेत. या कामामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा कामांच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मनपा प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी बॅरिकेड लावले जातात, जेणेकरून नागरिक कामाच्या ठिकाणी जाऊ नयेत आणि अपघात टाळता येतील. मात्र, अलीकडेच अशाच बॅरिकेडमुळे एक धक्कादायक घटना घडली असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
ही घटना अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात घडून आली. या घटनेत एका वृद्ध महिलेसोबत अपघात घडून आला. रस्त्यावरून चालत असताना अचानकपणे तिथे लावलेलं लोखंडी बॅरिकेड तिच्यावर कोसळलं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये जोरदार वाऱ्यामुळे बॅरिकेड हलतंय आणि अचानक कोसळतंय हे स्पष्ट दिसतं. नेमकं त्याच वेळी ही महिला त्या ठिकाणाहून चालत जात होती आणि तिच्यावर बॅरिकेड कोसळलं. त्यामुळे ती जोरात खाली पडली आणि जखमी झाली. सुदैवानं आजूबाजूला उपस्थित लोकांनी वेळीच धाव घेतली आणि बॅरिकेड बाजूला करून महिलेला मदत केली.
या घटनेनंतर सोशल मीडियावर मनपासह स्थानिक प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्यांची कामं करताना सुरक्षेची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची नीट काळजी घेतली जाते का, असा सवाल आता युजर्सद्वारे विचारला जात आहे. विशेषतः वाऱ्याचा वेग लक्षात घेता अशा प्रकारचे बॅरिकेड्स अधिक मजबूत पद्धतीने लावण्याची गरज अधोरेखित होते. मनपा प्रशासनानेही या व्हिडीओची दखल घेतली असून, व्हिडीओ ज्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे, त्या व्यक्तीकडून अधिक माहिती मागवण्यात आली आहे.
Recent incident in Andheri-W: Senior citizen injured by falling barricades, needed major surgery. @mybmc @mybmcRoads Ensure proper barricading on Marve Rd to protect pedestrians from dug-up roads & also vehicles. Safety first! 🚧🚗 #MumbaiRoadSafety
Video courtesy : @AndheriLOCA https://t.co/d3efSQCu2u pic.twitter.com/38X8SSGejx— SaferRoadsSquad🚦 (@SaferRoadsSquad) April 21, 2025
मुंबईसारख्या शहरात, जेथे सतत मोठ्या प्रमाणावर नागरी वर्दळ असते, तिथे अशा घटनांकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. फक्त रस्ते बनवणं महत्त्वाचं नाही, तर त्या प्रक्रियेमध्ये नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्य असायला हवी. अन्यथा अशीच एखादी घटना भविष्यात जीवघेणी ठरू शकते. या घटनेचा व्हिडिओ @SaferRoadsSquad नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका यूजरने लिहिले आहे, “मी इथे पुढच्या इमारतीत राहतो, कारण हा फक्त १५० मीटरचा भाग आहे आणि ६ महिन्यांपासून तो पूर्ण झाला नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या बॅरिकेड्सवर स्क्रू का बसवले जात नाहीत?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही