(फोटो सौजन्य – X)
पाकिस्तान सुपर लीग २०२५ मध्ये, मैदानावर फक्त चौकार आणि षटकारमुळेच नाही तर खेळाडूंना दिलेल्या भेटवस्तूंसाठीही फार चर्चेत आहे. कराची किंग्जने त्यांच्या खेळाडूंना हेअर ड्रायर आणि दाढी ट्रिमर सारख्या भेटवस्तू गिफ्ट दिल्या आहेत. भेटवस्तूंची या शर्यतीत आता मात्र लाहोर कलंदर्सने सर्वांनाच टाकले आहे. खरंतर, ईस्टरच्या खास प्रसंगी, लाहोर कलंदर्सने त्यांच्या सर्व खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला भेटवस्तू दिल्या. पण सर्वात शाही भेट मिळाली ती संघाचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीला. यावेळी त्याला २४ कॅरेट गोल्ड प्लेटेड आयफोन १६ प्रो गिफ्टमध्ये देण्यात आला. जेव्हा शाहीन मैदानावर हा अद्भुत फोन उघडत होता तेव्हा त्याच्या आजूबाजूचे सर्व खेळाडू आश्चर्यचकित झाले. सोशल मीडियावर हा क्षण आता शेअर करण्यात आला असून लोक तो पुन्हा पुन्हा पाहत आहेत.
शाहिदने जसा हा फोन चालू केला, त्यावेळी जवळच उभा असलेला त्याचा मित्र आणि हरिस रौफ हसला आणि म्हणाला, ‘नाही भाऊ, हा अन्याय्य आहे!’ त्यांची ही मजेदार प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहत्यांना ती खूप आवडली आहे. पीएसएलमध्ये खेळाडूंना भेटवस्तू देण्याची ही पद्धत नवीन नाही. याआधी कराची किंग्जने त्यांचा खेळाडू जेम्स विन्सला हेअर ड्रायर आणि हसन अलीला दाढी ट्रिमर भेट म्हणून दिला होता. त्या व्हिडिओ क्लिप्समुळे सोशल मीडियावरही मोठी खळबळ उडाली.
पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२५ ही एक टी२० क्रिकेट स्पर्धा आहे जी दरवर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाते. यात लाहोर कलंदर्स, कराची किंग्ज, इस्लामाबाद युनायटेड यांसारख्या ६ फ्रँचायझी संघांचा समावेश असतो. या लीगमध्ये पाकिस्तानी तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूही सहभागी होतात. पीएसएल ही पाकिस्तानमधील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग मानली जाते, ज्यात दरवर्षी काही ना काही मनोरंजक घडताना दिसून येते.
The iPhone has landed 📱😉
Our Captain Qalandar receives a gift he’s worthy of 💛🤴🏽
A custom 24K Gold-plated IPhone 16 Pro, made just for Lahore Qalandars’ main man, Shaheen! pic.twitter.com/PYigEiJvRR— Lahore Qalandars (@lahoreqalandars) April 20, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @lahoreqalandars नावाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो युजर्सपर्यंत पोहचला असून अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते लोक असे खुश होत आहेत जणू त्यांनी याआधी कधी आयफोन पाहिलाच नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सर्वांसमोर गिफ्ट उघडण्याची काय गरज, याला लिचडपणा बोलतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही