मी नाय त्यातली, कडी लाव आतली! अवकाशातून पडले अन् गाडीत जाऊन अडकले... काकांचा स्वॅग पाहाल तर दंग व्हाल; Video Viral
पराक्रमी लोकांची आपल्या देशात काही कमी नाही… रिकामटेकडे लोक नको ते प्रताप करायला जातात आणि मग आपले पराक्रम अंगावर आले की मग त्यातून जणू काही घडलंच नाही असं दाखवत गुपचूप तिथून पळ काढतात. आपल्या आजूबाजूला अशा लोकांचा वावर तुम्ही कधी ना कधी तरी पाहिला असेलच पण नसेल पाहिला तरी आता चिंता करू नका कारण सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दृश्य पाहता येणार आहे. आसमान गिरे और खजूर मै गिरे या म्हणीला साजेसे ठरणारे दृश्य अलीकडेच इंटरनेटवर शेअर करण्यात आले आहे ज्यात एक काका खरोखर अवकाशातून पडत डायरेक्ट खाली पार्क केलेल्या एका कारला धडकल्याने दृश्य दिसून येते. काका फक्त कारवर पडत नाही तर कारची काच फोडून मजेशीररित्या यात अडकलेही जातात. पण खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा काका काहीही न घडल्याची ऍक्टिंग करू लागतात. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तरपणे जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एका रस्त्यावरचे दृश्य दिसून येत आहे. रस्त्याच्या बाजूला अनेक चारचाकी पार्क केलेल्या असतात आणि याच वेळी अचानक एक काका अवकाशातून जोरदार खाली पार्क केलेल्या एका चारचाकीवर आदळतात. ते इतक्या वेगाने आणि जोरात गाडीवर पडतात की त्यामुळे गाडीची काच फुटते आणि ते थेट या काचेच्या मध्येच अडकले जातात. पण काका असतात अतिशहाणे, आपल्यामुळे झालेले गाडीचे नुकसान आपल्याला भरायला लागू नये म्हणून क्षणाचाही विलंब न करता ते लगेचच तिथून कसेबसे उठतात आणि रस्यावर उभं राहून जणू आपण काही केलंच नाही असं दाखवत गुपचूप तिथून निघून जातात. ही घटना खरंतर असते गंभीर कारण काका जिथे पडले तिथे कार नसतीच तर त्यांना मोठी दुखापत होऊ शकली असती पण काकांची एकंदरीतच ऍक्टिंग इतकी कमाल असते की गंभीर वाटणारे हे दृश्य क्षणातच लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणते.
हा व्हायरल व्हिडिओ @marathi_jokes_special नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आज पर्यंत असा व्हिडिओ नाही पहिला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काकाला स्टंटमॅन करा…” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सॉप्ट लाडींग”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.