छुटकू चोर! उसाची चोरी पकडली जाताच चिमुकला हत्ती खांबाच्या मागे जाऊन लपला; पहा तरी कसा बरं पकडला गेला? मजेदार Video Viral
सोशल मेडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात जे नेहमीच लोकांचे मनोरंजक करत असतात. या व्हिडिओजच्या मदतीने आपल्याला प्राण्यांचे आयुष्य आणखीन जवळून पाहता आणि जाणून घेता येतं. कधी शिकारीचे तर कधी प्राण्यांचे मजा मस्तीचे मोहून टाकणारे बरेच व्हिडिओ इंटरनेटवर शेअर होत असतात आणि आताही इथे असाच एक मनमोहक आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणार सुंदर दृश्य शेअर करण्यात आलं आहे ज्यात हत्तीच्या पिल्लाची निरागसता दिसून आली. चिमुकला हत्ती शेतात उसाची चोरी करतो खरा पण चोरी पकडली जाऊ नये म्हणून तो असे काही करतो की पाहून सर्वांनाच हसू अनावर होते. चला काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एका शेतातील दृश्य दिसून आहेत. खुले रान अन् त्याच्याशेजारी एक रास्ता आहे आणि याला लागूनच एक विजेचा खांब तुम्हाला व्हिडिओत दिसून येईल. इथेच तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला यात एक चिमुकला हत्ती विजेच्या खांबाच्या मागे लपलेला दिसून येतो. हत्तीचे बाळ लहान असले तरी त्याचे शरीर इतकेही लहान नाही की ते खांबाच्या मागे लपू शकेल आणि यामुळेच त्याचा हा लपण्याच्या मार्मिक प्रयत्न इथेच फेल होतो. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, हत्तीच्या या पिल्लाने खरंतर शेतातील ऊस चोरून खाल्लेले असतात आणि आपल्याला कोणी शिक्षा करू नये किंवा आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून लपण्याच्या मिश्किल प्रयत्न तो करत असतो. लपण्यासाठी त्याने निवडलेली जागा, त्याचा अपयशी ठरलेला प्रयत्न आणि ते छुटुकले रूप पाहून आता युजर्स मात्र घायाळ झाले आहेत. हत्तीच्या या निरागस प्रयत्नांवर सर्वांनाच हसू अनावर झाले असून हे दृश्य आता वेगाने सोशल मीडियावर शेअर केले जात आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @elephantsofworld नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याच्या आईने त्याला सांगितलं असेल की कोणी दिसलं तर लपून रहा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे कुठे आहे, मला तर तो दिसलाच नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्या छोट्या बाळाला ऊस खाऊ द्या”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.