Andhra Pradesh accident cement truck passed over man video goes viral
Accident Viral Video : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. काही भयावह व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. गेल्या काही काळात अपघातांचे प्रमाण वाढले असून यांचे भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सध्या असाच एक भयावह अपघाताचा व्हिडिओ (Viral Accident Video) व्हायरल होत आहे. पण अपघात झालेल्या व्यक्तीसोबत मोठा चमत्कार घडला आहे.
नेमकं काय घडलं?
आज देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय या आंध्रप्रदेशच्या घटनेतून झाला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशच्या तेतागुंटा राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. या मार्गावरुन एक सिमेंट ट्रक वेगाने जात होता. ज्याने दुचाकीस्वाराला धडक दिला. ट्रक या व्यक्तीच्या अंगावरुन गेला होता. गाडीचा चूरा झाला पण व्यक्ती सुखरुप बचावला आहे. त्याला किरकोळ जखमा झाल्या असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. तो एका लग्नाला निघाला होता. यावेळी ही घटना घडली आहे. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Couple Romance : कारच्या रुफवर कपलचा खुल्लम खुल्ला रोमान्स ; लिपलॉक करणाऱ्या जोडप्याचा VIDEO VIRAL
🚨 Andhra Pradesh, Kakinada: Photographer Narendra narrowly escaped after falling under a lorry while avoiding a speeding Miller truck on Tetagunta NH. He was heading to a wedding, suffered minor injuries. CCTV footage going viral. pic.twitter.com/UJEEE3MlL9 — Deadly Kalesh (@Deadlykalesh) October 6, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ @Deadlykalesh एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. या घटनेने सर्वांचा थरकाप उडाला आहे. अनेकांनी चमत्कार घडला असा समज केला आहे. एका युजरने काळ आला होता, पण वेळ नाही असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने यमराज काका सुट्टीवर होते वाटतं असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने एकच धुमाकूळ घातली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.