सध्या सोशल मीडियावर आपल्याला लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा मनोरंजक व्हिडिओ आपण पाहतो तर कधी आश्चर्याचा धक्का देणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहिल्यावर प्रश्न पडतो की खरेच असे घडू शकते का? सध्या असाच लोकांना थक्क करू न सोडणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण चक्रावले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
एका तरूणाला त्याच्या लॅपटॉप स्क्रीनच्या आत असे काही दिसले आहे कि तो देखील विचारात पडला आहे. वास्तविक, लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये मुंगी रेंगाळताना दिसल्याचा हा व्हिडिओ आहे.या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओ पाहणाऱ्यांना एकच प्रश्न पडला आहे की, मुंगी आतमध्ये कशी गेली आमि आता ती बाहेर कशी येणार. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकजण हैराण झाले आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, आदित्य नावाच्या युजरने शेअर केलेला हा व्हिडिओ आहे. त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनच्या आतमध्ये एक मुंगी फिरताना दिसत आहे. आदित्यने स्क्रीनवर बोट ठेवून दाखवले आहे की, ती मुंगी स्क्रीनच्या आतमध्ये आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मुंगी माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनच्या आतमध्ये गेली आहे, आता तिला बाहेर कसे काढू. या असामान्य दृश्यामुळे अनेकजण हैराण झाले आहेत. अनेकांनी एकच प्रश्न विचारला आहे मुंगी तिथे कशी गेली.
व्हायरल व्हिडिओ
this ant went inside my laptop’s screen!?!? pic.twitter.com/uPA7X2eOUV
— aditya✨ (@adityakvlte) October 3, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देत एका युजरने म्हटले आहे की, लॅपटॉपच्या उष्णतेमुळे उबलेली ही मुंगीची अंडी असू शकते. तर दुसऱ्या एका युजरने याला “फ्री डायनॅमिक वॉलपेपर” म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, “दोन वर्षांपूर्वी या मुंग्यांनी माझा संपूर्ण मदरबोर्ड खाल्ला होता,” आणखी एका युजरने म्हटले आहे की, जशा टीव्हिला मुंग्या लागतात तसेच आता लॅपटॉपला ही मुंग्य लागल्या आहेत. तर अनेकांनी हैराण झाल्याचा इमोजी यावर शेअर केला आहे.