Aurangzeb's photo placed temple and the villagers wrote Aurangya video goes viral
नुकताच अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. मात्र या चित्रपटाशी संबंधित एक विचित्र असे व्हिडिओ समोर येत आहे. या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत औरंगजेबाने केलेला छळ पाहून लोकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणी भावनिक झाले आहे तर कोणी तीव्र राग व्यक्त करत आहे. एका तरुणाने तर चित्रपटगृहात स्क्रीनचा पडदा फाडला होता, तर काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी लुटलेले खजिना सोधण्यासाठी मध्य प्रदेशच्या बुऱ्हाणपूर येथील किल्ल्यावर हजारो नागरिक जमा झाले होते. छावा चित्रपटाने औरंगजेब केवढ क्रूर होता हे दाखवले आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुघल सम्राट औरंगजेबावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. औरंगजेबाच्या कारकिर्दिवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच महाराष्ट्रात त्याची कबर असल्यामुले देखील रादकीय वातावरण तापले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. ही कबर काढून टाकावी अशी मागणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आम्हालाही प्रत्येकाला असंच वाटतं. फक्त काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात. कारण ती कबर संरक्षित आहे. काँग्रेसच्या काळात त्या कबरीला एएसआयचं (ASI) संरक्षण मिळालेलं आहे”, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत मांडले आहे.
दरम्यान सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका मंदिराच्या दरवाज्यात औरंगजेवाचा फोटो लावण्यात आला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, या मंदिराच्या दरवाज्यापाशी ठेवलेल्या औरंगजेबाच्या फोटोवर औरंग्या लिहिलण्यात आलेले आहे. शिवाय मंदिरात येणार-जाणारे लोक औरंगजेबाच्या फोटोवरुन पाय देऊन जात आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @aamhi_talegaonkar या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. पोस्ट होताच या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने खूप छान असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने नाद करायचा नाय, असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने हिच त्याची औकात आहे असे म्हटले आहे. काहींनी हार्टचे इमोजी कमेंट सेक्शनमध्ये शेअर केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.