
Bangladesh Biker Saves Kitten from Being Crushed Under Car ( बांगलादेशी बाईकस्वाराने मांजरीच्या पिल्लाला गाडीखाली चिरडण्यापासून वाचवले )
अचानक, त्याला रस्ता ओलांडून धावणारे एक मांजर दिसली. त्याच वेळी, एक गाडी वेगाने येत असते आणि ते मांजर गाडीच्या चाकाखाली चिरडले गेले असते. इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ बांगलादेशातील रादवान नावाच्या या तरुणाचा असून त्यांने या घटनेची माहिती या व्हिडिओ द्वारे सांगितली आहे.
रादवान पाहताक्षणी खाली उतरतो आणि गाड्या थांबवतो. त्याच्या या कृतीने गाड्या थांबतात. तो या छोट्या मांजराला उचलतो.जर या तरुणाने एका सेकंदही उशीर केला असता, तर ते मांजर गाडीखाली चिरडले गेले असते. याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसेल.
या छोट्याश्या मांजराला वाचवल्यानंतर, रादवान तिला आपल्या कुर्त्याच्या खिशात ठेवतो. बाईक चालवतानाही मांजर अनेक वेळा पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला पकडून ठेवतो. नंतर, तो मांजराला एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवतो आणि दूध पाजतो. ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद करण्यात आली आहे.
RBI Compensation Rules : ATM मधून पैसे निघाले नाहीत? खात्यातून रक्कम कट झाली, RBI चा नियम जाणून घ्या
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच, लोक भावूक झाले. म्हणाले की, “खरी माणुसकी,” “मांजराचा जीव वाचवला आणि तिला नवीन जीवन दिले,” आणि “असे लोक खूप कमी आहेत,” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अनेक वापरकर्त्यांनी सांगितले की गर्दीच्या वाहतुकीतही एका प्राण्याचा जीव वाचवणे हे एक मोठे कृत्य होते. काहींनी रादवानला नायक म्हटले. प्राणीप्रेमी विशेषतः या व्हिडिओने भावूक झाले.
” ते म्हणाले की मुके प्राणी अनेकदा रस्त्यावरील अपघातांना बळी पडतात. अशा परिस्थितीत, एका सामान्य व्यक्तीचे हे कृत्य प्रेरणादायी आहे.”
ही घटना केवळ एका छोट्याश्या मांजराचे बचाव कार्य नाही. ही एक आठवण आहे की लहान गोष्टी देखील मोठा फरक घडवू शकतात. कोणताही विचार न करता, रादवानने गाडी थांबवली आणि मांजराला वाचवले. त्याच्या मते, जर ते मांजर गाडीखाली आले असते तर त्याचा मृत्यू झाला असता.
व्हिडिओमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी स्पष्टपणे दिसत आहे. तरीही, त्या तरुणाने धोका पत्करला आणि मांजराला वाचवले. नंतर, ते त्याला घेऊन निघून गेले.