Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Police Hotel Viral Video: हॉटेलमध्ये गेलेल्या बहीण-भावाला धरलं धारेवर; बिहार पोलिसांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Bihar Police Hotel Viral Video: जेवायला गेलेल्या बहीणीवर भावावर दादागिरी करत कोण रे ही तुझी असे विचारुन बिहार पोलिसांनी त्रास दिला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 28, 2025 | 04:11 PM
Bihar police misbehave with siblings to eat at a restaurant viral video

Bihar police misbehave with siblings to eat at a restaurant viral video

Follow Us
Close
Follow Us:

Bihar Police Hotel Viral Video: बिहार: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये बिहार पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील दिसून येत आहे. विरोधकांनी बिहारमधील व्यवस्थेवर टीकास्त्र डागले आहे. तर सत्ताधारी पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र दरम्यान, बिहार पोलिसांच्या दादागिरीचा व्हिडिओ सोशल मीडिय़ावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये जेवायला गेलेल्या बहीणीवर भावावर दादागिरी करत कोण रे ही तुझी असे विचारुन पोलिसांनी त्रास दिला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस हे नक्की रक्षक आहेत का असा प्रश्न उपस्थित केला.

बिहार पोलिसांनी जेवणासाठी गेलेल्या बहीण -भावासोबत गैरवर्तन केले. कटिहारमधील एका हॉटेलचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार भाऊ-बहीण रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होते. त्यावेळी पोलीस पथक नियमित तपासणीसाठी तिथे पोहोचले. एका पोलीस अधिकाऱ्याने तरुणाला सोबत असलेल्या युवतीबद्दल विचारलं. जेव्हा त्याने ती आपली बहीण असल्याचं सांगितलं, तेव्हा अधिकाऱ्याने उद्धटपणे प्रतिक्रिया दिल्यामुळे वाद वाढला. ‘बहीण आहे.. तर असं काय बोलतोस.. विचारुही शकत नाही का’ असं पोलीस म्हणाला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीं व्यक्तीने पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाबाबत सांगितले. ते म्हणाले की, “पोलीस अधिकाऱ्यांचा बोलण्याचा आणि वागण्याचा सूर अनावश्यकपणे आक्रमक होता. यामुळे रेस्टॉरंटमधील इतर लोकांचे देखील लक्ष गेले.” सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आधी ते दोघे भाऊ-बहीण चिंतेत दिसतात. नंतर ते दटावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारताना दिसतात, मात्र इतर पोलीस शांत उभे होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला. यानंतर बिहार पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

This incident occured yesterday night when we went for family dinner in barsoi bihar which falls under katihar dist. So we cant even take our sister for family dinner if its election time in bihar? @ECISVEEP @KatiharSp @katiharpolice @narendramodi @NitishKumar #BiharElection2025 pic.twitter.com/gqCPXrDnON — yash agrawal (@yash1524) October 25, 2025

नागरी सुरक्षा अशा प्रकारे काम करते का?

सोशल मीडियावर बिहार पोलिसांच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “भाऊ आणि बहीण एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसले होते तेव्हा एक धूर्त पोलिस अधिकारी आला आणि त्याने त्यांच्याशी गैरवर्तन केले. सीसीटीव्हीमुळे संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली. नागरी सुरक्षा अशा प्रकारे काम करते का?” असा प्रश्न नेटकऱ्याने उपस्थित केला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

व्हिडिओ शेअर करताना नेटकऱ्याने लिहिले की, “जर बिहारमध्ये निवडणुकीची वेळ असेल तर आम्ही आमच्या बहिणीला कुटुंबासोबत जेवणासाठीही घेऊन जाऊ शकत नाही.” लोकांच्या संतापानंतर, कटिहार येथील पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) यांनी गैरवर्तनाची पुष्टी करणारी चौकशी सुरू केली, त्यानंतर त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले. या संदर्भात सोशल मीडिया पोस्ट करुन बिहार पोलिसांनी माहिती दिली आहे.

एक सी0सी0टी0वी0 का वायरल वीडियो प्राप्त हुआ, जिसमें दिनांक-24.10.2025 को थानाध्यक्ष बारसोई द्वारा बारसोई रास चौक स्थित BR-11 रेस्टोरेंट में बैठे कुछ व्यक्तियों के साथ बकझग की जा रही है। इस मामले की जाॅच पुलिस उपाधीक्षक,(मुख्यालय) कटिहार द्वारा कराई गई। (1/3) pic.twitter.com/yHpWeEMbJ7 — Katihar Police (@SpKatihar) October 27, 2025

 

 

Web Title: Bihar police misbehave with siblings to eat at a restaurant viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 04:11 PM

Topics:  

  • Bihar News
  • police
  • viral news

संबंधित बातम्या

काळीमा! तब्बल ५१,३९३ दलित महिलांवर अत्याचार, ३ गुन्ह्यांमागे १ गुन्हा घरगुती हिंसाचाराचा; अंगावर काटा आणणारे दाहक वास्तव
1

काळीमा! तब्बल ५१,३९३ दलित महिलांवर अत्याचार, ३ गुन्ह्यांमागे १ गुन्हा घरगुती हिंसाचाराचा; अंगावर काटा आणणारे दाहक वास्तव

Vasai Crime: पोलीस ठाण्याजवळच ड्रग्स फॅक्टरी; दुर्लक्ष केल्याने वरिष्ठ निरीक्षक वनकोटी सस्पेंड
2

Vasai Crime: पोलीस ठाण्याजवळच ड्रग्स फॅक्टरी; दुर्लक्ष केल्याने वरिष्ठ निरीक्षक वनकोटी सस्पेंड

Navi Mumbai : वाहतूक कोंडीने वाजविले तीन तेरा! पालिका आणि पोलीस प्रशासनाच शहरातील वाहतूक नियोजन फक्त कागदावरच
3

Navi Mumbai : वाहतूक कोंडीने वाजविले तीन तेरा! पालिका आणि पोलीस प्रशासनाच शहरातील वाहतूक नियोजन फक्त कागदावरच

संतापजनक! भरधाव कारची स्कूटरला धडक; महिला फरपटत गेली अन्… ; अपघात करुन चालकाने काढला पळ, Video Viral
4

संतापजनक! भरधाव कारची स्कूटरला धडक; महिला फरपटत गेली अन्… ; अपघात करुन चालकाने काढला पळ, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.