खोडसाळपणा तर पाहा! नागिणीला पाहताच बिहारच्या मुलांनी फोनवर वाजवली बिन, मग पुढे जे घडलं... Video Viral
बिहार म्हटलं की त्यांचा चावटपणा पहिला मनात येतो. बिहारचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. बहुतेक विचित्र गोष्टी या बिहारमध्ये घडून येतात. तुम्ही विचारही करणार नाही अशा गोष्टी बिहारची लोक करून मोकळीही होतात. आताही एक असाच व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे ज्यात बिहारची काही मूळ नागिणीला पाहताच तिच्यासमोर बिन वाजवताना दिसून आले. मुख्य म्हणजे ही बिन त्यांनी मोबाईलवर प्ले केली. बिनच्या तालावर नाग डोलू लागतो असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल मात्र बिहारच्या मुलांनी याचे प्रत्यक्ष दर्शन घेऊ पाहिले. आता त्यांच्या या प्रयोगात पुढे काय घडले ते जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात रस्त्यावर एक साप रेंगाळत असल्याचे दिसून येते. बिहारमधील काही खोडकर मुलांना ते लक्षात येते आणि मजा करण्यासाठी ते सापासमोर त्यांच्या मोबाईल फोनवर नागिनची बिन वाजवू लागतात. बिनचा आवाज ऐकताच साप रस्त्यावर आपला फणा पसरून नाचू लागतो . चित्रपटात पाहिलेले हे दृश्य सत्यात घडत असल्याचे पाहून सर्व मुले खुश झाली आणि त्यांनी या ही दृश्ये आपल्या कॅमेरात कैद केली. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक नागिणीला असे नाचताना पाहून फारच खुश झाले आणि या क्षणांची मजा लुटू लागले.
नागिणीचा हा व्हिडिओ @ViralTT नावाने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बस कर भावा, आता काय नागमणी घेऊनच थांबणार का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ, तो उष्णतेत जळत आहे, बीनचा त्याच्याशी काहीही संबंध नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.