(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडियावर सध्या एक क्युट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हत्तीच्या पिल्लाशी संबंधित आहे. सकाळची झोप ही प्रत्येकाला फार प्रिय असते. लहानपणी जेव्हा आई आपल्याला उठवायला येते तेव्हा आपण 5 मिनिटं, 5 मिनिटं करून ते टाळायचा प्रयत्न करतो. आपल्या बालपणी असे प्रत्येकानेच केले असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? हे फक्त माणसांसोबतच नाही तर प्राण्यांसोबतही घडून येते. हेच पटवून देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात एक चिमुकला हत्ती झोपेसाठी आईला मनवताना दिसून आला. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक हत्तीणी तिच्या बाळाला सकाळी लवकर उठवताना दिसत आहे. हे दृश्य इतके सुंदर आहे की ते पाहून कोणाचाही दिवस आनंदात जाईल. व्हिडिओमध्ये, एक लहान हत्तीचे पिल्लू जमिनीवर झोपलेले दिसत आहे, ते सकाळच्या आळशी झोपेत हरवलेले दिसून आले. यानंतर त्याची आई, मादी हत्तीणी, तिच्या सोंडेने त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. हत्तीला हे करताना पाहून असे वाटते की ती तिच्या मुलाला म्हणत आहे, “उठ बेटा, सकाळ झाली!” सुरुवातीला, मूल थोडे रागावते, परंतु आई त्याला उठवण्यासाठी वारंवार विनंती करते. शेवटी आईचा धाक कामी येतो आणि चिमुकला हत्ती चिडतच उठतो.
चिमुकल्या हत्तीचे हे गोंडस रूप पाहून सर्वच सुखावले तर काहींना हे दृश्य पाहून हसूच आवरता आले नाही. गजराजाचे असे अनेक व्हिडिओज याआधीही बऱ्याचदा व्हायरल झाले आहेत. हत्ती हा शरीराने मोठा असला तरी त्याचे स्वभाव मात्र शांत आहे. प्राण्यांचे असे क्युट व्हिडिओ लोकांच्या मनोरंजनाचे काम करतात. हत्तीचे हे गोंडस रूप सर्वांनाच घायाळ करण्यासारखे आहे. हा व्हायरल व्हिडिओ @the.realshit.gyan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करत असून याच्या कमेंट्समध्ये अनेकांनी आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आणि तुम्ही मोठे झाल्यावरही ते तुम्हाला विनाकारण उठवता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याला का उठवताय? त्याला शाळा नाहीये असं वाटतंय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.