
आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये 'व्हॅकेन्सी'
सोशल मिडिया क्रिएटरने हा व्हिडिओ @Two_generations_one_vlog नावाच्या आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून व्हिडिओला सध्या जबरदस्त व्ह्यूज मिळत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये, चहाचा थर्मॉस घेतलेल्या एका तरुणाला क्रिएटक विचारतो की, दिवसाला तुम्ही किती कप चहाची विक्रि करता? यावर चहा विकणारा तरुण २५०० ते ३००० पर्यंतची कमाई दररोज होते असे सांगतो. यावर क्रिएटर पुन्हा त्याला प्रश्न करतो की, यातून किती पैशांची बचत होते ज्यावर चहा विकणारा तरुण सांगतो की, दिवसाला १५०० पर्यंतची तो बचत करतो.
यानंतर क्रिएटर तरुणाला विचारतो की, तुम्ही कुठे राहता ज्यावर तरुण सांगतो की, तो बिकानेरमध्ये भाड्यावर राहतो. इतकंच नाही तर त्याचे चहाचे एक दुकानही असल्याचे तो स्पष्ट करतो. दुकान भाड्याच्या जागेवर असून तिथे ५००० रुपये भाडे त्याला द्यावे लागते. अशाप्रकारे सर्व खर्च वजा केल्यावर तो महिन्याला ३०,००० ते ३५,००० रुपयांपर्यंतची कमाई करतो जी अनेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सॅलरीहून अधिक आहे.
‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
चहावाल्याकडे आहे व्हॅकेन्सी
चहावाल्या तरुणाकडे आता काम इतके वाढले आहे की त्याने एक व्हॅकेन्सी देखील ओपन केली आहे. तत्काळ जाॅईन होण्यास जो इच्छुक असेल त्याला लगेच कामावर घेण्यात येईल. व्हिडिओत व्यक्ती क्रिएटरला म्हणतो की, कुणी मुलगा ओळखीत असेल तर मला सांगा. चहावाल्याची ही कमाई आता अनेकांना भुरळ पाडत असून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “१५,००० रुपये पगाराची ऑफिसची नोकरी करणारी व्यक्ती अशा थाटात वावरते, जणू काही तिच्याकडे ५-७ कोटी रुपये आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ऐकायला सोपं वाटतं पण फिरुन चहा विकण्यात फार मेहनत आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मला घ्या कामावर, मी बेरोजगार आहे”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.