(फोटो सौजन्य: Instagram)
ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
भारताच्या मैत्री संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी भगवान गणेशाची बर्फाची मूर्ती तयार केली. या खास क्षणांचा व्हिडिओही त्यांनी इंटरनेटवर शेअर केला. व्हिडिओत आपल्याला पांढऱ्या रंगाचा बर्फाचा गणपती दिसून येतो ज्याच्या गळ्यात फुलांची माळ घातलेली असते. शास्त्रज्ञांनी पारंपरिक आरती आणि पूजा केली आणि गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत त्यांनी पाण्यात मूर्तीचे विसर्जन केले. विसर्जनासाठी, स्टेशनच्या आत पाण्याने भरलेल्या बादलीत मूर्ती ठेवण्यात होती, जिथे बर्फ हळूहळू वितळून पाण्यात मिसळला. ही एक पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धत होती.
View this post on Instagram
समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
अंटार्कटिका साजरा केला सण
लक्षात घ्या, अंटार्कटिका सारख्या ठिकाणी आणि तेथील कठीण परिस्थित सण साजरा करणे काही सोपी गोष्ट नाही. इथे हवेचे तापमान खूप जास्त असते आणि सुविधा फार मुबलक प्रमाणात असतात. अशा परिस्थितीतही संस्कृति आणि आस्थेला टिकवून ठेवणे फार मोठी गोष्ट ठरते. बर्फाच्या मूर्ती केवळ सर्जनशीलच नव्हती तर त्यातून पर्यावरण संरक्षणाचा संदेशही दिला जात होता. हा व्हिडिओ मैत्री स्टेशनवर कार्यरत असलेले डॉक्टर अनिरुद्ध धर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






