अब्बा नहीं मानेंगे! ब्लॅक पँथर आणि जॅग्वार आले आमने-सामने; सर्वांना वाटलं लढाई करणार पण घडलं काही भलतंच... मजेदार Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. लोक व्हायरल होण्यासाठी इथे अनेक गोष्टी शेअर करताना दिसून येतात, यासोबतच इथे बऱ्याचदा प्राण्यांचे व्हिडिओज देखील शेअर केले जातात ज्यात आपल्याला प्राण्यांचे आयुष्य दिसून येते.इथे प्राण्यांच्या लढतीचेही थरार शेअर केले जातात जे पाहणे नेहमीच मजेदार ठरते. जंगलातील काही मोठे शिकारी जेव्हा आमने-सामने येतात तेव्हा त्यांच्यात संघर्ष हा होतोच मात्र आता जो व्हिडिओ व्हायरल होत आहे यात काहीसे वेगळे आणि अनोखे दृश्य दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये ब्लॅक पँथर आणि जॅग्वार एकमेकांसमोर आल्याचे दिसून आले ज्यानंतर आता त्यांच्यात लढाई सुरु होईल असे सर्वांना वाटू लागले मात्र व्हिडिओत घडलं काहीतरी भलतंच ज्याने सर्वच हादरून गेले. व्हिडिओतील ही दृश्ये तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का देतील.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक जॅग्वार फळीवर बसल्याचे दिसून येत आहे आणि याचवेळी तिथे एक ब्लॅक पँथर येतो. दोघांना आमने-सामने पाहून अनेकांना वाटते की आता त्यांच्यात अति-तटीची लढाई सुरु होईल मात्र असं काहीच घडत नाही. जॅग्वारला पाहताच ब्लॅक पँथर खुश होतो आणि आनंदाने त्याची गळाभेट घेऊन त्याला प्रेम करू लागतो. जॅग्वारही यावेळी त्याला पाहून खुश होतो आणि दोघेही एकमेकांमध्ये मग्न होऊन एका प्रियकर प्रेयसीप्रमाणे एकेमेकांना प्रेम करू लागतात. व्हिडिओतील हे दृश्य आता अनेकांना थक्क करत असून प्राण्यांमधील हे प्रेम पाहून आता युजर्स सुखावून जात आहे. लोक हे दृश्य पाहून चांगलेच खुश झाले असून हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
प्राण्यांचा हा व्हायरल व्हिडिओ @leandro_silveira_iop नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्यांची पिल्लं कशी जन्माला येतील, मी जाऊन घेण्यास उत्सुक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सर्वात प्रेमळ प्राणी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “प्रेम सुंदर आहे, लवकरच त्यांची सुंदर मुले जन्माला येतील”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.