(फोटो सौजन्य: X)
माणूस जसजसा प्रगत होत चालला आहे तसतशा काही प्रजाती पृथ्वीवरून नामशेष होऊ लागल्या आहेत. मानवाने झाडे तोडली, शहरे बांधली आणि प्राण्यांच्या वस्तीवर आपले नवीन साम्राज्य उभारले ज्यांवर हळूहळू प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होऊ लागल्या. आपल्या बुद्धीच्या जोरावर मानव फार आधीपासूनच प्राण्यांवर आपले अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करू लागला आहे. मानव प्रगत झाला पण प्राणी-पक्षी मागे राहिले आणि याचाच फायदा घेत मानव फार आधीपासून त्यांना डिवचण्याचा आणि त्यांची खिल्ली उडवण्याचे काम करत आला आहे. आताही असाच काहीसा प्रकार घडून आल्याचे दिसून आले आहे ज्यात महिलेने आपली मर्यादा ओलांडत माकडासोबत एक चुकीचे वर्तन केल्याचे दिसून आले. व्हिडिओतील दृश्य आता सर्वांचाच संताप अनावर करत असून लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत. चाल व्हिडिओत काय घडले ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओ हा क्रिमियातील सफारी पार्कमधील आहे. इथे डाना नावाच्या ऑरंगुटानला (Orangutan) ठेवण्यात आले आहे. ऑरंगुटान ही एक माकडाची प्रजाती आहे जी पृथवीवरून नामशेष होत चालली आहे. व्हिडिओमध्ये एक रशियन बॉक्सर अनास्तासिया लुचकिना (Anastasia Luchkina) पिंजऱ्यात ठेवण्यात आलेल्या ऑरंगुटानला ई-सिगारेट देत त्याच्यासोबत तो सिगारेट ओढताना दिसून आली. तिच्या या कृतीने आता सोशल मीडियावर तिला आता मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
अनास्तासिया लुचकिना ही २४ वर्षांची असून व्हिडिओमध्ये ती ई-सिगारेट ओढताना दिसून येत आहे. ती स्वतः ई-सिगारेट ओढते आणि मग पिंजऱ्यात असलेल्या ऑरंगुटानच्या चेहऱ्यासमोर ठेवून त्यालाही हे सिगरेट ओढण्यास सांगते, त्यानंतर तिचे पाहून तोही हा सिगरेट ओढू लागतो. एक नाही दोन नाही तो तब्बल चार वेळा सिगरेट ओढत तोंडातून धूर सोडतो. सिगरेट हा आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतो अशात प्राण्यांनाही व्यसनाच्या असे घातक प्रकार करायला लावणे फार चुकीचे आहे. यामुळे प्राण्याच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक आता लुचकिनावर आपला संताप व्यक्त करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे भयंकर आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा प्राण्यांवर होणारा अत्याचार आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कोणत्या प्रकारच्या व्यक्तीला असे वाटते की अशा गोष्टी करणे योग्य आहे?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.