
Boy called police for 10 rupees Fanta Know whats' the matter video viral
Funny Viral Video : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने पोलिसांना फोन करुन बोलावले आहे, तेही केवळ १० रुपयांसाठी. पण नेमकं कारण ऐकून पोलिसांचेही डोकं चक्रावले आहे. यामुळे त्यांची मोठी धावपळ झाली आहे.
व्हायरल व्हिडिओनुसार, तरुणाने किराणा दुकानातून १० रुपयांचा फंटा खरेदी केला होता. परंतु दुकानदाराने त्याच्याकडून २० रुपये घेतले. यामुळे मुलाला राग आला. मुलाने रागाच्या भरात पोलिसांना कॉल केला. पोलिस आल्यावर त्यांना जेव्हा प्रकरण समजले त्यांचे डोके चक्रावून गेले होते. खरं तरं फंटाच्या बाटलीवर किंमत लिहिण्यात आली होती. ज्यामध्ये २० रुपये लिहून ते खोडण्यात आले होते, आणि त्याची खरी किंमत १० रुपये अशी लिहिण्यात आली होती. उरलेले १० रुपयांचा डिस्कॉउंट होता. पण दुकानदाराने तरुणाला २० रुपयांना फंटा दिल्याने राग आला होता. यामुळे त्याने थेट पोलिसांना कॉल केला.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर @_the.baklols या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये १० रुपयांसाठी पोलिसांना यावे लागले असे लिहिले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने मेल इगो असे लिहिले आहे, तर दुसऱ्या एकाने त्याचे बरोबर आहे, एक ग्राहक म्हणून तो जागरुक राहिला असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने योग्य वेळी योग्य पाऊल उचलले दादा, उद्या त्याने फंटा १०० ला विकला असता तर? तर आणखी एकाने बरोबरच केले असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.