माणुसकी कुठे गेली? ट्रेनमागे धावत राहिला तरुण विक्रेता, पण ग्राहकाने...; काय घडलं जाणून येईल संताप, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अलीकडच्या काळात माणुसकी जशी हरवत चालली आहे. रेल्वे स्टेशनवरील एका तरुण विक्रेत्यासोबत असे काही घडले आहे की, संताप येईल. एका ग्राहकाने विक्रेत्याला पैसे न देताचा पळ काढला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक तरुण धावत्या ट्रेनमागे पळताना दिसत आहे. एका ग्राहकाकडे खिडीकीतून सामानाचे पैसे मागत आहे. पण ग्राहक काही पैसे देण्यास तयार नाही. तरुण ग्राहकाला कळकळीची विनंती करत आहे. तसेच ट्रेन वेगाने धावत असताना आपल्या कष्टाची किंमत घेण्यासाठी तरुणाची झटपट सुरु आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून संतापची लाट उसळली आहे.
व्हायरल व्हिडिओ
Never play with poor and weak 💔 pic.twitter.com/BIM2rRdecj — Vishakha 🌟 (@MasalaaMinds) November 12, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @MasalaaMinds या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ही घटना नेमकी कुठे घडली, याची माहिती अस्पष्ट आहे. पण अनेकांनी ग्राहकावर संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्यांने, मला आशा आहे की त्या ग्राहकाला त्याचे कर्म परत मिळेल, तर दुसऱ्या एकाने माणुसकी मेली आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने कसे लोक आहेत या जगात, दुसऱ्याच्या कष्टाचे चोरताना पण लाज नाही वाटत यांना असे म्हटले आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यावर देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण यामध्ये ग्राहकाचे पेमेंट फसले होते आणि याच वेळी त्याची ट्रेन सुटली होती. यावेळी दुकानदाराने ग्राहकाला कॉलरने पकडून ठेवले होते. ग्राहकाला त्याचे महागडे घड्याळ केवळ दोन समोशाच्या बदल्यात द्यावे लागले होते.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






